अध्ययन अध्यापन प्रक्रिया
म . ए . सो भावे प्राथमिक शाळा ही 125 वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेली एक उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध आहे . या शाळेत अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही फक्त शिक्षककेंद्री न राहता ती बालकेंद्री / विद्यार्थीकेंद्रीत असावी या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जातात..
अध्ययन अध्यापन आनंददायी व्हावे यासाठी प्रत्यक्ष अनुभूती, प्रात्यक्षिक, कृती , गटकार्य यावर भर दिला जातो. वर्गातील बोलक्या भिंतींमुळे शिक्षण आनंददायी होते . अध्ययन अध्यापन हे ज्ञानरचनावादावर आधारित आहे. प्रत्यक्ष अनुभव ही शिक्षणाची गुरुकिल्ली आहे हे जाणून शाळेत पहिली ते चौथीची प्रशस्त प्रयोग शाळेची उभारणी केलेली आहे आणि येथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण दिले जाते . तंत्रज्ञानाचा वापर (एलसीडी प्रोजेक्टर ) वापरून शाळेने आधुनिकतेची कास धरलेली आहे . तसेच क्षेत्रभेटी ,जीवन व्यवहार उपक्रम , यातून प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान दिले जाते .
अध्ययन अध्यापन सुकर व्हावे वेळेचा सदुपयोग व्हावा यासाठी सहअध्ययन पद्धतीचा वापर केला जातो . वर्गातील हुशार विद्यार्थी व वर्गात अभ्यासात मागे असणारे विद्यार्थी यांची जोडी करून हुशार मुलाने त्याच्या मित्राचा अभ्यास घ्यायचा अशा प्रकारे भीती कमी होऊन अभ्यासात प्रगती होण्यास मदत होते त्यालाच ‘अभ्यासमित्र’ असेही म्हटले जाते . शिक्षणाची समान समान संधी सर्वांना मिळावी यासाठी विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता ओळखून त्याप्रमाणे गट करून छोट्या छोट्या उपक्रमातून वर्गावर्गातून शिक्षण दिले जाते .