क्रीडा स्पर्धा

क्रीडा करंडक स्पर्धेत म .ए .सो.भावे प्राथमिक शाळेचे घवघवीत यश

मा . उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते बक्षीस समारंभ संपन्न

विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी ,खिलाडू वृत्ती निर्माण व्हावी या हेतूने दरवर्षी म .ए .सो. क्रीडा करंडक स्पर्धेचे आयोजन केले जाते .यावर्षीही ‘बारामती’ येथे म .ए .सो. क्रीडा करंडक स्पर्धेचे आयोजन केले होते . लंगडी , गोल खो -खो , डॉजबॉल , सूर्यनमस्कार घालणे या स्पर्धा उत्साहात पार पडल्या .

यामध्ये म .ए .सो. भावे प्राथमिक शाळेतील मुलांचा लंगडीचा संघ उपविजयी झाला व मुलींच्या लंगडीच्या संघाला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले . डॉजबॉल या खेळात वेदांत स्वप्निल भोकरे या विद्यार्थ्याला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून बक्षीस मिळाले .या विद्यार्थ्यांना श्री. विवेक डफळ, श्री. राजेंद्र वेदपाठक, श्री. विशाल शितोळे, सौ. श्वेता कोंडे , सौ . शुभदा शिरोडे, सौ. वीणा शिंदे यांनी मार्गदर्शन केले होते.

पारितोषिक वितरण प्रसंगी उपमुख्यमंत्री मा . अजित दादा पवार , मा . बाबासाहेब शिंदे ( अध्यक्ष म . ए .सो नियामक मंडळ ) सौ .आनंदी ताई पाटील ( उपाध्यक्षा म . ए . सो नियामक मंडळ ) श्री . सुधीर भोसले ( सहाय्यक सचिव ) , श्री . विजय भालेराव ( म .ए . सो नियामक मंडळ सदस्य ) व पदाधिकारी उपस्थित होते .

माननीय मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .

डॉजबॉल स्पर्धेत घवघवीत यश

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी , हुजूरपागा लक्ष्मी रोड , पुणे ३० आयोजित हुजूरपागा करंडक आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत डॉजबॉल या खेळात इ . ३ री व ४ थी गटात म .ए .सो भावे प्राथमिक शाळेचा मुलींचा संघ विजयी झाला .
विजयी संघाला फिरताचषक , प्रशस्तीपत्रक व सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले .या सर्वांना श्री . विशाल शितोळे व श्री . विवेक डफळ यांनी मार्गदर्शन केले होते .
मा.मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व मा.उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी विजेत्या विद्यार्थीनींचे कौतुक केले.

 

हुजूरपागा करंडक रिले मुली स्पर्धा इ.२री द्वितीय क्रमांक

सर्व खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षक विवेक डफळ व विशाल शितोळे सर यांचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन!!?????

Scroll to Top