गांधीजींच्या विचारांप्रमाणे शिक्षण म्हणजे बालकांच्या शरीर, मन व आत्मा यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे होय.याचाच अर्थ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे म्हणजे शिक्षण होय आणि हा सर्वांगीण विकास केवळ पाठ्यपुस्तकातून पूर्ण होण्यास काही मर्यादा प्राप्त होतात.या मर्यादा सहशालेय उपक्रमातून साध्य करणे शक्य होऊ शकते.म्हणून सद्य पाठ्यपुस्तकात व पाठ्यांशात सहशालेय उपक्रमाचे महत्त्व अतुलनीय आहे.हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सहशालेय उपक्रमांचे अचूक नियोजन शाळेत दरसाली केले जाते. त्याचे विस्ताराने विवरण पुढील प्रमाणे.
म. ए .सो.भावे प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले .
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य सांगितले व शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले . इ .१ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या गोष्टी सांगितल्या .विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती .
माननीय मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले . या उपक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
म.ए .सो . भावे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी , शिक्षक , पालक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी 'शांतता . . . .पुणेकर वाचत आहेत 'या उपक्रमात सहभाग घेतला .विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देणे ,आपल्या साहित्य संपत्तीची ओळख करून देणे ,वाचनासाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता .
दि . ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत म .ए .सो . भावे प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी पालक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या आवडत्या पुस्तकाचे वाचन केले .
माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व माननीय उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगितले .अतिशय उत्साहाने सर्वजण या उपक्रमात सहभागी झाले .
दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही म.ए .सो. भावे प्राथमिक शाळेत किल्ले बनविणे स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल आवड निर्माण व्हावी , शिवकालीन दुर्गम अशा किल्ल्यांची माहिती त्यांना मिळावी व किल्ले संवर्धनाचे महत्त्व समजावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
यावर्षी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी इ . प्रतापगड , तोरणा , शिवनेरी , राजगड , विशाळगड , रायगड , पुरंदर इ . दुर्गम किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या .यासाठी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करण्यात आला .विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या .
या स्पर्धेचे परीक्षण म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थिनी प्रसिद्ध गिर्यारोहक सौ . सुप्रिया चक्रवर्ती यांनी केले .स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे . ?प्रथम क्रमांक - प्रतापगड मार्गदर्शक शिक्षक - श्रीमती भाग्यश्री हिरास , श्रीमती लिना जाधव , सौ . विमल सोनवणे , सौ . शुभांगी आठल्ये ?द्वितीय क्रमांक - तोरणा किल्ला मार्गदर्शक शिक्षक - सौ . माहेश्वरी थोपटे , श्री . राजेंद्र वेदपाठक , सौ . सारिका पोतदार , सौ . अमृता पवार ? उत्तेजनार्थ क्रमांक - शिवनेरी किल्ला मार्गदर्शक शिक्षक - सौ . विद्या जगताप , सौ . दिपाली कुलकर्णी , सौ . अनिता जगदाळे , सौ . कविता मुजुमले
माननीय मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा गायकवाड व माननीय उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्तिपत्र देऊन त्यांचे कौतुक केले व शाबासकीही दिली.
म.ए .सो .भावे प्राथमिक शाळेत बालदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा गायकवाड व
उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांच्या हस्ते माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माजी
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याची माहिती सांगितली .रंगीत फुग्यांनी शाळेची सजावट करण्यात आली होती .विद्यार्थी रंगीत
कपडे घालून शाळेत आले होते .
बाल दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .विद्यार्थ्यांनी आवडत्या चित्राचे रेखाटन करून त्यात रंग भरले .विद्यार्थ्यांना 'बालगणेश ' हा बालचित्रपट दाखवण्यात आला .शाळेत कलर्स डे साजरा करण्यात आला .लाल , पिवळा , हिरवा , निळा , केशरी , पांढरा ,काळा या रंगांच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले .
या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .माननीय मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची भावे प्राथमिक शाळा , पुणे आणि १९८८ इ . ४ थी अ चे माजी विद्यार्थी सहआयोजित आशिष चांदोरकर स्मृती करंडक आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेमध्ये इ. १ ली ते ४थी या गटामध्ये म . ए . सो . भावे प्राथमिक शाळेला व्दितीय क्रमांक मिळाला आहे .या स्पर्धेत कु. स्वरा किरण कदम या विद्यार्थीनीला उत्कृष्ट वाचक पुरस्कार मिळाला आहे .बक्षीस समारंभ माजी विद्यार्थी व नाट्य अभिनेते मा. अमेय लागू यांच्या हस्ते झाला. या वेळी १९८८ सालचे इयत्ता थी अ मधील माजी विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने
उपस्थित होते .
या सर्वांना सहशिक्षिका श्रीमती रेणुका महाजन यांनी मार्गदर्शन केले होते . मा.मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड , मा.उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.
हुजूरपागा कला व क्रीडा करंडक - कथाकथन स्पर्धेत म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेतील कु .तन्वी मोटे - प्रथम क्रमांक कु. जान्हवी बागव - उत्तेजनार्थ चौथा क्रमांक पटकावला आहे . यांना श्रीमती रेणुका महाजन यांनी मार्गदर्शन केले होते .
नाट्यछटा स्पर्धेत कु .आरोही प्रदीप कदम या विद्यार्थीनीने तृतीय क्रमांक पटकावला आहे . आरोहीला सौ . स्वाती रावस यांनी मार्गदर्शन केले होते .माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्यध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी विद्यार्थीनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले .
'विद्यार्थ्यांचा आहार व आरोग्य ' याविषयी पालकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने तसेच याविषयीची योग्य माहिती पालकांना मिळावी यासाठी म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेत आहार तज्ञ डॉ .सुकेषा सातवळेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .
इ . १ ली ते ४ थी चे वय मुलांच्या वाढीचे वय असते .या वयात त्यांना सकस आहार मिळणे आवश्यक असते . मुलांसाठी विविध पौष्टिक पदार्थांच्या पाककृती , जेवणाची व फळे खाण्याची योग्य वेळ , मुलांसाठी आहाराच्या योग्य सवयी इ . विषयांवर डॉ . सुकेषा सातवळेकर यांनी पालकांना
मार्गदर्शन केले . पालकांच्या मनातील प्रश्नांचीही त्यांनी उत्तरे दिली .
मा . मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांनीही यावेळी पालकांशी संवाद साधला व सर्वांचे आभार
मानले .या उपक्रमाला सर्व पालक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
'नागरी शिष्टाचार ' हा म.ए .सो . भावे प्राथमिक शाळेचा वार्षिक उपक्रम आहे . नागरी शिष्टाचार पाळणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे . विद्यार्थी आपल्या पालकांसोबत मोटार सायकलवर प्रवास करत असतात . वाहतुकीचे नियम पाळणे , गाडी चालवताना हेल्मेट वापरणे ही सर्वांची
जबाबदारी आहे . हा नागरी शिष्टाचाराचा एक भाग आहे . विद्यार्थ्यांची व पालकांची सुरक्षितता लक्षात घेऊन 'सेवा सहयोग संस्थेतर्फे 'म .ए .सो .भावे
प्राथमिक शाळेतील पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी हेल्मेट चे वाटप करण्यात आले .
माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी यावेळी पालकांना व विद्यार्थ्यांना गाडी चालवताना हेल्मेटचा वापर करून वाहतुकीसंदर्भातील नागरी शिष्टाचार पाळण्याचे आवाहन केले .विद्यार्थी व पालकांनीही गाडी चालवताना हेल्मेट
वापरण्याचा संकल्प केला .
या उपक्रमाला सर्व शिक्षक , पालक , विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
म.ए .सो .भावे प्राथमिक शाळेत कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने 'पुस्तक हंडी' हा उपक्रम साजरा करण्यात आला .विद्यार्थ्यांमध्य वाचन संस्कार रुजविणे , वाचनाची आवड निर्माण करणे . हा या उपक्रमाचा उद्देश होता .
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी मनोरा तयार करून प्रतिकात्मक पुस्तकहंडी फोडली . यातील पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी देण्यात आली .विद्यार्थ्यांनी यावेळी अवांतर वाचन करण्याचा संकल्प केला . विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाची बासरी , मोरपीस , सुदर्शन चक्र , तुळशीपत्र , दहीकाला ,
कालियामर्दन इ . विषयावर प्रकटवाचन केले .
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कृष्ण जन्माची गोष्ट सांगितली . 'किती सांगू मी सांगू कुणाला ' व 'अच्युतम केशवम ' या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले . कृष्णाची गाणी म्हणून दाखवली . सर्व विद्यार्थ्यांना गोपाळकाल्याचा प्रसाद
देण्यात आला .
माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले .सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले .या उपक्रमाला सर्व विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
म.ए .सो .भावे प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी झाली .माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले .
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची गोष्ट सांगणे स्पर्धा घेण्यात आली . मा.मधुरा ओक यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.विद्यार्थ्यांनी यावेळी लोकमान्य टिळकांच्या विविध गोष्टी सांगितल्या .इयत्ता दुसरी वसंत गटातील विद्यार्थ्यांनी 'लोकमान्य टिळक ' या विषयावर बालसभेचे सादरीकरण केले . शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती सांगितली . वसंत गटातील विद्यार्थी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांची वेशभूषा करून आले होते .
विद्यार्थ्यांनी बालसभेत लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित गाणी सादर केली . बालसभेत विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांचे कार्य , त्यांच्या बालपणीच्या व मोठेपणीच्या गोष्टी तसेच टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव, वृत्तपत्र याविषयी माहिती सांगितली . लोकमान्य टिळकांचे गुण आत्मसात करण्याचा संदेश बालसभेच्या अध्यक्षांनी बालसभेतून दिला . या बालसभेला शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
शनिवार दिनांक ६/७/२०२४ रोजी" आनंददायी शनिवार" उपक्रमांतर्गत खगोलशास्त्र विषयाचा अभ्यास करणारी कुमारी मधुरा बार्शीकर यांनी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र या विषयातील टेलिस्कोप, उपग्रह, रॉकेट, इस्त्रो , आकाशगंगा, सूर्यमाला या विषयाला अनुसरून छोट्या छोट्या संकल्पना पीपीटी व व्हिडिओ दाखवून छान समजावून दिल्या.आकाशगंगा , सूर्य , चंद्र ,तारे ,ग्रह ,सॅटेलाइट , रॉकेट या सर्वांबद्दल लहान मुलांच्या मनात प्रचंड कुतूहल असते . विद्यार्थ्यांनी उत्साहाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मधुरा बार्शीकर यांनी दिली . आकर्षक व्हिडिओ व चित्रे यांच्यामुळे विद्यार्थ्यांना या संकल्पना समजण्यास मदत झाली .विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र विषयाची आवड निर्माण करण्यास या उपक्रमामुळे नक्कीच मदत होईल .
या दिवशी विद्यार्थ्यांनी रांगोळी काढणे ,क्ले माती पासून विविध वस्तू बनवणे , घोटीव कागदापासून आकर्षक वस्तू बनवणे ,मैदानी खेळ इत्यादीचा आनंद लुटला .
माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांनी कुमारी मधुरा बार्शीकर यांचे आभार मानले . शिक्षकांचे व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .या उपक्रमाला सर्व शिक्षक , विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
म.ए .सो .भावे प्राथमिक शाळेत इ .१ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . विद्यार्थ्यांचे हे शैक्षणिक वर्ष संपत आले असून मुलांना अभ्यासासोबत खेळण्याचाही आनंद मिळावा हा या उपक्रमाचा हेतू होता .या बालमेळाव्यात शाळेतील सर्व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले . या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेचे नाव असलेला बॅच देऊन करण्यात आले .
बालचमू आपल्या मित्र मैत्रिणींसोबत खेळण्यात गुंग झाले होते .जंपिंग राऊंड , मिकीमाऊस , फिरते चक्र इ . खेळणी हे या बालमेळाव्याचे मुख्य आकर्षण होते . विद्यार्थ्यांनी या सर्व खेळण्यांचा मनमुराद आनंद लुटला . यावेळी सर्वांना खाऊही देण्यात आला . विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही या
मेळाव्यात सहभागी झाले होते . शाळेचे प्रांगण मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेले होते.विद्यार्थी व पालकांचा उत्साह ओसंडून वाहत होता . शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थी शाळेच्या आवारात रेंगाळत होते .
अतिशय उत्साहात बालमेळावा संपन्न झाला . मा . मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले . या उपक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
म.ए .सो .भावे प्राथमिक शाळेत सन १९९५ ते २००५ या काळात इ . ४ थी पास आऊट झालेले विद्यार्थी व सर्व आजी - माजी शिक्षक स्नेहमेळाव्यास उपस्थित होते . सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेतील इ १ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले श्रीरामाचे चित्र रेखाटलेले भेटकार्ड व तिळगूळ देऊन करण्यात आले .कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांनी 'सोन्याची जेजुरी ' हे नृत्य सादर करून केली. मा . मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले .त्यांनी माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेच्या भविष्यातील संकल्पांविषयी माहिती दिली व विद्यार्थी मेळाव्याचे प्रयोजन
आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केले .यावेळी शाळेतील वैविध्यपूर्ण उपक्रम व शाळेच्या प्रगतीचा आलेख व्हिडिओ क्लीप मधून दाखवण्यात आला .माजी विद्यार्थ्यांनी सर्व माजी शिक्षकांचे पूजन करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली . या वेळी अभिषेक दंडगे ,शिवानी देशपांडे, खुशाल पुरंदरे या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या मजेशीर आठवणी सांगितल्या. शाळेत मिळालेल्या संस्काराच्या शिदोरीतून आम्ही घडलो , असे त्यांनी सांगितले .शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ . उज्ज्वला गायकवाड व शाळेच्या माजी शिक्षिकांनी माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व गत आठवणींना उजाळा दिला . त्यानंतर गप्पांची मैफिल रंगली .सर्वांना अल्पोपहार व चहापान देण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका श्रीमती रेणुका महाजन यांनी व आभाराचे काम मा . उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी केले . अशा प्रकारे आनंदपूर्ण वातावरणात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न झाला .
दिनांक २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली .संपूर्ण भारतात हा सोहळा साजरा करण्यात आला . म .ए .सो. भावे प्राथमिक शाळेतही या सोहळ्याचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी भेटकार्ड तयार करून त्यावर प्रभू श्रीरामाचे चित्र रेखाटले .घरासमोर रांगोळी काढली .शाळेत आठवडाभर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रभू श्रीरामाच्या गोष्टी सांगितल्या . शाळेत दिवे लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला .विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली . 'प्रभू श्रीरामचंद्र की जय ' 'रामभक्त हनुमान की जय 'अशा घोषणा देत सर्वजण प्रभात फेरीत सहभागी झाले होते .विद्यार्थ्यांनी श्रीराम ,सीता , लक्ष्मण , भरत , हनुमान यांची वेशभूषा केली होती . हे या प्रभातफेरीचे मुख्य आकर्षण होते .
वर्गात रामायणातील गोष्टी सांगणे ही स्पर्धा झाली.त्यामध्ये प्रथम क्रमांक -कु.कार्तिकी आनंद जोशी द्वितीय क्रमांक - कु. धनश्री जीवन खताळ या विद्यार्थ्यांचा आला. त्यांचे खूप खूप अभिनंदन .
माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांच्या हस्ते श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अयोध्येत झालेल्या सोहळ्याची माहिती सांगितली .या उपक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
पुणे, दि. २४ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्ताने म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेतील इ. पहिली ते चौथीच्या ५५० विद्यार्थ्यांनी ‘माझा शिवाजी राजा’ हे महानाट्य म. ए. सो. रेणुका स्वरूप प्रशालेच्या मैदानावर साकारले. राज्याभिषेकाच्या प्रसंगावेळी शिवाजी महाराजांचे खऱ्याखुऱ्या घोड्यावरून रंगमंचावर आगमन होताच प्रेक्षकांनी महाराजांवर फुलांचा वर्षाव केला. हा प्रसंग या महानाट्याचे महत्त्वाचे वैशिष्टय ठरले. पाठयपुस्तकातून शिकलेला शिवरायांचा इतिहास या महानाट्यातून सादर करण्याचे काम शाळेतील बालचमूंनी केले. त्यांनी रंगमंचावर उत्तम समन्वय साधत आपल्या अभिनय कौशल्याचा परिचय सर्वांना करून दिला.
प्रभावी प्रकाश योजना, उत्तम नेपथ्य, रमणीय नृत्ये यामुळे हे महानाट्य प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे ठरले. या महानाट्याचे दिग्दर्शन तन्मय जक्का, अनिल गेराडे, मंथन महाडिक, सोहम आठवले यांनी केले. संहितालेखन व मार्गदर्शन श्री. मोहन शेटे व ध्वनिमुद्रण कलाश्री स्टुडिओ यांनी केले.
या वेळी पुण्याचे माजी खासदार व इतिहास अभ्यासक मा. प्रदीप रावत प्रमुख पाहुणे उपस्थित होते. म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे यांनी अध्यक्षस्थान भूषवले. या प्रसंगी म. ए. सो. च्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष मा. सौ. आनंदीताई पाटील शाळेच्या महामात्र मा. डॉ. मानसी भाटे व म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे सदस्य मा. विजय भालेराव, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते .
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .
म .ए .सो भावे प्राथमिक शाळेत दिवाळी निमित्त जीवन व्यवहार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना खरेदी-विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी दिवाळी साहित्य , खेळणी , सौंदर्य प्रसाधने , सरबत,भेळ , इडली इ . स्टॉल लावण्यात आले .विद्यार्थ्यांनी स्टॉलवर स्वतः खरेदी-विक्रीचा आनंद घेतला .
या उपक्रमाचे उद्घाटन म .ए सो भावे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मा . सौ .प्रतिभा गायकवाड यांनी केले .त्यांनी विद्यार्थ्यांना व्यवहार कौशल्याचे महत्व सांगितले . स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व खरेदीही केली . पुस्तकातील ज्ञानाचे उपयोजन व्हावे व विद्यार्थ्यांमध्ये दैनंदिन जीवनात गरजेचे असणारे व्यवहार कौशल्य आत्मसात व्हावे या हेतूने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .शिक्षकांनी विद्यार्थ्यांना यावेळी खरेदी - विक्री कशी करावी याचा प्रत्यक्ष अनुभव दिला व आर्थिक नियोजनाचे महत्त्व समजावून सांगितले .
माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .या उपक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
'आपले आयुर्वेद व आरोग्य ' या उपक्रमांतर्गत म .ए .सो. भावे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी अकरा आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून दिवाळीसाठी उटणे तयार केले . यासाठी आवळा , त्रिफळा , गुलाब , ज्येष्ठमध ,बावची , आंबेहळद , संत्रा , कपूरकाचरी , नागरमोथा, अनंतमूळ , वाळा इ .वनस्पतींपासून तयार केलेल्या चूर्णाचा वापर करण्यात आला. या सर्व आयुर्वेदिक वनस्पतींचे महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले .विद्यार्थ्यांनी शाळेत
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः उटणे तयार केले . स्वतः तयार केलेल्या उटण्याची विक्रीही केली .
भारताला आयुर्वेदाची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे .विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही आयुर्वेदाचे महत्त्व अबाधित आहे हे विद्यार्थ्यांना समजावे या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . विद्यार्थ्यांनी यावेळी स्वतः उटणे तयार करून त्याची विक्री केल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष
विक्रीचा अनुभव मिळाला व त्यांच्यातील विक्री कौशल्य विकसित होण्यास मदत झाली .
कार्यानुभव या विषयातंर्गत विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी कागदी आकाशकंदील व पणती देखील तयार केली . या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव मिळाला तसेच त्यांना नवनिर्मितीचा आनंदही मिळाला .माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ
.वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .या उपक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
म .ए.सो भावे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त सरस्वती पूजन व पाटी पूजन केले . विद्यार्थीनींनी पारंपारिक भोंडल्याची गाणी म्हणत फेर धरला . भोंडल्यानंतर सर्वांनी खिरापतीचा आस्वाद घेतला .
या नऊ दिवसांमध्ये शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .जसे- ?विविध क्षेत्रात अपंग असूनही कर्तृत्व गाजवणाऱ्या मानसी जोशी ,
अरुणिमा सिन्हा , सुधा चंद्रन , हेलन केलर , मालती होला यासारख्या अनेक महिलांविषयी माहिती सांगितली . या सर्व कर्तबगार महिलांची माहिती
सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल . विद्यार्थ्यांनी कापसापासून तेलवात , फुलवात या प्रकारच्या वाती तयार केल्या व स्वतः तयार केलेल्या वाती घरी दिवा लावण्यासाठी वापरल्या .
तृणधान्ये व कडधान्याचे कुंडीत बी रुजवून बीजांकुरण ही प्रक्रिया अनुभवली . विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रातील देवीच्या छायाचित्रांचा संग्रह संग्रहवहीत केला . महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे नऊ दिवस नियमित पठण करून देवीचे नामस्मरण केले . ?सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून देवीचा गोंधळ, जोगवा इ . नृत्यप्रकार सादर केले . नऊ दिवस नऊ रंगांच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवून कलर्स डे साजरा केला . विविध वैज्ञानिक प्रयोग जसे-ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो यासारखे . यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला . विद्यार्थ्यांनी स्वतः झेंडूच्या फुलांच्या माळा तयार करून शाळेची सजावट केली . मोड आलेल्या कडधान्यांची पौष्टिक कोशिंबीर तयार केली . विद्यार्थ्यांनी इंदिरा संत , पद्मा गोळे , संत बहिणाबाई या कवयित्रींच्या कवितांचे वाचन केले .विद्यार्थ्यांनी परिपाठामध्ये पुण्यातील देवींच्या मंदिरांबद्दल माहिती सांगितली . यासारख्या वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली . सृजनशीलतेचा विकास होण्यास मदत झाली . नवनिर्मितीला चालना मिळाली मा . मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले . या उपक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
आपल्या कृतीने समाजात बदल घडवून आणणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करण्याचा उत्सव म्हणजे नवरात्र .
नवरात्रोत्सवानिमित्त म.ए . सो. भावे प्राथमिक शाळेत पुणे शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील बालकांच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला . या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील ३ री ४ थी च्या विद्यार्थिनींनी गोंधळ हा नृत्यप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मा . मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .उपस्थित सर्व महिलांचा व त्यांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला . उपस्थित महिलांनी आपल्या मनोगतातून भावे प्राथमिक शाळेतील वैविध्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले . सर्वांनी भावे प्राथमिक शाळेच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगशाळेला व ग्रंथालयाला भेट दिली . प्रयोगशाळेत प्रयोग करून दाखवणाऱ्या व ग्रंथालयात वाचन करणाऱ्या बालचमूंचे सर्वांनी कौतुक केले .
मा . उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रेणुका महाजन यांनी केले . या उपक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .



दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही म .ए .सो भावे प्राथमिक शाळेत गणपती बाप्पाचे आगमन झाले . इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाच्या गोष्टीचे नाट्यीकरण सादर केले .गणपतीची वैविध्यपूर्ण गाणी सादर करण्यात आली . विद्यार्थ्यांनी गणपतीच्या गोष्टी सांगितल्या .इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनीने भरतनाट्यम हा सुंदर नृत्य प्रकार सादर केला .गणपतीची आरती करण्यात आली व सर्वांना प्रसाद देण्यात आला .यावेळी विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष पठण केले . इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक मातीचा गणपती शाळेत तयार केला. विद्यार्थ्यांची 'पर्यावरणपूरक मखर बनवणे ' ही स्पर्धा घेण्यात आली .विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर मखर बनवून स्पर्धेमध्ये सहभाग घेतला . मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
'आपले आयुर्वेद व आरोग्य' या उपक्रमांतर्गत इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी पंचामृत तयार केले . दूध,दही, तूप, साखर आणि मध एकत्र करून विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पंचामृत तयार केले. पंचामृतामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते व स्मरणशक्ती वाढते. पंचामृत शक्तिवर्धक आहे . ही सर्व माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितली . विद्यार्थी व शिक्षकांनी पंचामृताचा आवडीने आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे महत्त्व कळावे तसेच आयुर्वेदाचा वापर त्यांनी दैनंदिन जीवनात करावा या हेतूने हा उपक्रम घेण्यात आला होता.
मा . मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले . या उपक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
'आपले आयुर्वेद व आरोग्य ' या उपक्रमांतर्गत इ. २ री च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पंचखाद्य तयार केले . यासाठी मुलांनी 'ख' ने सुरु होणारे पाच पदार्थ खजूर , खारीक ,खोबरे ,खडीसाखर ,खसखस वापरले.
शिक्षकांनी मुलांना पंचखाद्याचे महत्त्व पटवून दिले . पंचखाद्य हे बुद्धिवर्धक व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहे व घरातील उपलब्ध साहित्यातून सहज करता येते याचा मुलांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला व मुलांना त्याचे महत्त्व समजले .
विद्यार्थ्यांनी पंचखाद्य हे डबा वेळापत्रकामध्ये बुधवारचा खाऊ म्हणून आणायचे ठरवले ,अशाप्रकारे बौध्दिक मेवा असलेले पंचखाद्य तयार करणे हा उपक्रम घेण्यात आला . मा. मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ.वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले . या उपक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
दिनांक २५ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये आपल्या घरातील ई - कचरा म्हणजेच निरुपयोगी मोबाईल ,चार्जर ,संगणक , रेडिओ , इलेक्ट्रॉनिक खेळणी इ . भावे प्राथमिक शाळेत जमा करण्याचे सर्व आजी व माजी विद्यार्थी व पालक , हितचिंतक व परिसरातील नागरिक यांना शाळेतर्फे आवाहन करण्यात येत आहे .
ई - कचऱ्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे . पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या हेतूने ई - कचरा संकलन व त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात येणार
आहे .
दि . १० ऑगस्ट २०२३ रोजी आझादी का अमृत महोत्सव २०२३ उपक्रमा अंतर्गत भावे प्राथमिक शाळेच्या आवारात सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी वसुधा वंदन करून गुलाब , लिंबू , कोरफड , कडुलिंब , पेरु इ वृक्षांची लागवड करून अमृत वाटिका तयार केली . यावेळी मा . मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व सांगितले व वृक्ष लागवडीचे आवाहन केले .
शनिवार दिनांक२४/०६/२०२३ रोजी भावेप्राथमिक शाळेत पालखीसोहळ्याचे आयोजन केले होते.विठ्ठल रुक्मिणीच्यासमवेत सर्व विद्यार्थीवारकरी पोशाखात शाळेच्यासभागृहात कार्यक्रमासाठीएकत्रित जमले होते.टाळमृदुंगांच्या गजरात 'विठ्ठल नामाची शाळा भरली...ʼअभंग म्हणत पांडुरंगाचा
गजर केला. वारीचे महत्वसांगण्यात आले. आयुर्वेद आणि आरोग्य या उपक्रमा अंतर्गत औषधी वनस्पतींची वृक्षदिंडी काढण्यात आली .डोक्यावर तुळस ,अडुळसा ,गवती चहा यासारखे औषधी वनस्पतींचे रोप घेऊन रस्त्यावरून शाळेला एक फेरी मारली वृक्षदिंडीत मुले उत्साहाने सहभागी झाली. सभागृहात माननीय मुख्याध्यापक व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते पालखीचे पूजन आणि आरती झाली. याच दिवशी माजी विद्यार्थ्यांच्या योगदानामुळे पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या नूतनीकरणाचे लोकार्पण करण्यात आले. अतिशय उत्साहात आनंदात पालखी सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग........
1978/79 या वर्षी इयत्ता 4 थी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन एप्रिल ,मे महिन्यात शाळेतील मुलांच्या पाण्याच्या टाकीचे नूतनीकरण करुन दिले ..नूतनीकरण झालेल्या पाण्याच्या टाकीचे शनिवार दिनांक 24 जून 2023 रोजी मा.मुख्याध्यापक श्री.अनिल खिलारे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले व विद्यार्थी वापरासाठी ही पाण्याची टाकी खुली करण्यात आली .
या प्रसंगी प्रकाश कुलकर्णी, शशिशेखर पाठक, चंद्रशेखर जाखडे, प्रशांत महामूलकर,महेश भागवत, संजीव जोगदेव, अभिजित लघाटे हे याच बॅचचे माजी विद्यार्थी तसेच पराग कुलकर्णी ( टाकीचे काम करून देणारे काँट्रॅक्टर) व ज्येष्ठ पत्रकार व शाळेचे माजी विद्यार्थी श्री.आनंद सराफ हे उपस्थित होते.. आता या पुढे विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झालेले आहे..याचे श्रेय सन १९७८/७९ या वर्षाच्या माजी विद्यार्थी बॅचला जाते.. या अनमोल योगदानासाठी शाळा १९७८/७९ च्या माजी विद्यार्थ्यांची कायम ॠणी राहील...???
भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला. माननीय उपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांच्या हस्ते व्यासमुनींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्यांच्या गोष्टी सांगितल्या .डोंगर , नदी , मुंगी , पुस्तक, मधमाशी या निसर्गातील गुरूंचे पूजन केले व त्यांची माहिती सांगितली .विद्यार्थी गुरु शिष्यांची वेशभूषा करून आले होते .विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाबाचे फूल व श्रीफळ देऊन कृतज्ञता व्यक्त केली .
शुक्रवार दिनांक ११/०८/२०२३ रोजी म.ए.सो भावे प्राथमिक शाळेत 'माझी माती माझा देशʼ या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्री. विश्वास शांताराम मोरे व वीरपत्नी दिपाली विजय मोरे यांचा सत्कार मा. मुख्याध्यापिका सौ. प्रतिभाताई गायकवाड यांनी केला.या कार्यक्रमाला शाळेचे सर्व विद्यार्थी व मा.उपमुख्याध्यापिका सौ.वृषाली ठकार बाई उपस्थित होत्या. या कार्यक्रमांमध्ये वीरपत्नी दिपाली मोरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अशाप्रकारे अतिशय प्रेरणावर्धक उपक्रम संपन्न झाला.
दरवर्षी पंढरपुराला विठुरायाचे नाव घेत वारकरी ऊन, वारा, पाऊस झेलत पोहोचतात. तसेच आमच्या शाळेत देखील पालखी सोहळ्यामध्ये आमचे बालवारकरी अक्षर दिंडी साजरी करतात यात अभंगाचे फलक वाचनाचे महत्त्व सांगणारे फलक घेऊन दिंडी शाळेतील परिसरात होते फिरताना विठुरायाचा नामघोष करतात वाचनाचे महत्त्व देखील आजूबाजूच्या परिसरातील लोकांना समजावून सांगात नाचत गात अक्षर दिंडीचा सोहळ्यात बालचमू रममाण होतात.
विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा जागृत व्हाव्यात यासाठी आपल्या वनवासी भाऊ-बहिणींसाठी दरवर्षी 'एक मुष्टी धान्यदान' या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यात शाळेतील शिक्षक-विद्यार्थी सहभागी होतात व एक किलो किंवा स्वइच्छेने त्यापेक्षा जास्त तांदूळ शाळेत जमा करतात. भोर येथील वनवासी कल्याण आश्रमाला विद्यार्थ्यांनी स्वच्छ व निवडलेल्या तांदूळाचे धान्यदान स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सुपूर्त केले जाते.यामुळे सामाजिक बांधिलकी हा संस्कार सहजरित्या घडतो.
शिक्षक- पालक सहसंबंध स्नेहपूर्ण व शैक्षणिक दृष्ट्या सुदृढ व्हावेत यासाठी पालक शाळेचे आयोजन करण्यात येते.यात पालकांनी त्यांच्या बालपणीच्या गोष्टी आठवून मनमोकळेपणे हसतखेळत सहभागी व्हावे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवला जातो.तो सफल होण्यासाठी वेळेचे सुयोग्य नियोजन केले जाते. विविध भाषिक खेळांचे, अभिव्यक्तीचे, नृत्य,गायन,नाट्य यावर आधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.यातूनच शिक्षक व पालक यांच्यातील सहसंबंध दृढ होतो.दरसाली उत्साहाने पालक सहभागी होतात व उत्तम असा प्रतिसाद मिळतो.
विद्यार्थ्यांना व्यवहाराची माहिती होण्यासाठी या उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष व्यवहार अनुभूती व्हावी यासाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येला या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.यात दिवाळीला लागणाऱ्या साहित्याचे तसेच काही खाण्याच्या पदार्थांची विक्री केली जाते यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार कसा घडतो हे यातून सहजरित्या समजते.
वक्तृत्व करताना व व्यासपीठावर वावरताना अंगी सभाधिटपणा यावा यासाठी बालसभा हा उत्तम उपक्रम आहे. यासाठी शिक्षक पुढील विषयांवर बाळासाहेब यांचे आयोजन करतात- मूल्ये, बोधकथा, क्रांतिकारक, स्वातंत्र्य, संस्कार, विविध लेखक- कवी यांच्या साहित्यावर आधारित इ. विषय यामुळे विद्यार्थ्यांचा व्यासपीठावरील बोलण्याचा आत्मविश्वास वाढतो व योग्य क्रमाने कार्यक्रमाचे सादरीकरण कसे करावे याचे ज्ञान त्यांना उत्तम प्रकारे होते.
दिनांक ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान क्रांती सप्ताह साजरा केला जातो. यात इयत्ता चौथीतील वर्गातील एक प्रतिनिधी रोज एका क्रांतिकारकाची गोष्ट सांगतो. क्रांतिकारक असे निवडले जातात की ज्यांची माहिती खूप कमी जणांना आहे. असे क्रांतिकारक निवडले जातात व त्यांची माहिती सांगितली जाते १५ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात गोष्ट सांगून या सप्ताहाची सांगता केली जाते. यामुळे विविध क्रांतिकारकांच्या कार्याचे महात्म्य विद्यार्थ्यांच्या मनावर ठसले जाते.
स्त्री- शक्तीचे महात्म्य सांगणारा नवरात्र उत्सव. या उत्सवाच्या निमित्ताने श्री शक्तीचा जागर या नऊ दिवसात केला जातो. यात स्तोत्र पठण तर होतेच परंतु काही सुप्रसिद्ध स्त्रियांची यात माहिती सांगितली जाते. अगदी पुराण काळापासून ते आत्ता नवयुगापर्यंतच्या धाडसी व साहसी अशा नवदुर्गांची निवड करून प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थिनी कडून ही कथा सांगण्यात येते. यामुळे स्त्री- शक्तीचे महत्व सर्वांना समजते.
गड-किल्ल्यांच्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिक्षक सांगतात. परंतु गड- किल्ले प्रत्यक्ष सर्व विद्यार्थी पाहत नाहीत. तेव्हा गडकिल्ल्यांची रचना कशी असते. त्याचा इतिहास हा सहजपणे प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना समजावा यासाठी किल्ले बांधणी किंवा किल्ले तयार करणे या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यात प्रत्येक वर्ग आपल्याला दिलेल्या किल्ल्यांची सुयोग्य अशी रचना करतात. यात मुलांचा शंभर टक्के सहभाग असतो त्यामुळे किल्ल्याच्या विषयीचे ज्ञान मुलांना उत्तम होते व त्याचा इतिहास समजला जातो. किल्ल्यांच्या विषयी माहिती होण्यासाठी हा अतिशय उत्तम असा उपक्रम आहे.
१४ नोव्हेंबर बाल दिन या दिवशी मुलांना उपक्रमातून शिक्षण द्यायचे म्हणून यासाठी दप्तराशिवाय, पाटीशिवाय शिक्षण.......
शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन होते. यात नाट्य, नृत्य, चित्रकला, संगीत, अभिव्यक्ती, प्रश्नमंजुषा, ठसेकाम असे उपक्रम घेतले जातात. तसेच काही वर्गातील मुलांमधीलच काही विद्यार्थी शिक्षक होऊन इतर वर्गात शिकविण्यात जातात.
उत्साही माजी विद्यार्थी व शाळा यांच्या सहयोगाने आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धा घेतली जाते. यात पुण्यातील जवळजवळ वीस शाळा सहभागी होतात व उत्तम सादरीकरण करून बक्षिसे प्राप्त करून जातात. यामुळे सहशालेय उपक्रमांचा खरा उद्देश साध्य होतो. इतर शाळांशी स्नेह संबंध दृढ होण्यास उत्तम असा हा उपक्रम आहे. यात सर्व शाळा उत्साहाने सहभागी होतात.
विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे लिखित रूपात सादरीकरण हस्तलिखातातून दर्शविले जाते. यासाठी २६ जानेवारी रोजी रविकिरण हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले जाते. यात आत्तापर्यंत विविध विषय हाताळले गेले आहेत.उदा. आई, भारतातील प्रसिद्ध महिला, प्रसिद्ध खेळाडू, क्रांतिकारक, भाषिक खेळ, बोधकथा, विविध साहित्यिक, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव इत्यादी ...
विद्यार्थी स्वतःच्या उत्तम हस्ताक्षरात या हस्तलिखिताचे लेखन करतात. अशा या उत्तमोत्तम हस्तलिखितांचा अनमोल ठेवा शाळेने जपून ठेवला आहे. माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ही हस्तलिखिते विद्यार्थ्यांना विशेष करून पाहण्यासाठी ठेवली जातात. यातून त्यांच्या बालपणीच्या शालेय जीवनातील स्मृती जागृत होतात.
समाजातील व्यावसायिकांची ओळख होण्यासाठी विविध प्रकारच्या व्यावसायिकांच्या मुलाखती विद्यार्थी प्रत्यक्ष जाऊन घेतात. त्यांना प्रश्न विचारून त्यांच्या नोंदी आपल्या जवळ ठेवतात यामुळे व्यवसायिकांची त्यांना जवळून ओळख होते. तसेच आपल्या आई-वडिलांची देखील जवळून ओळख होण्यासाठी विविध प्रकारचे प्रश्न विचारून आई-वडिलांची देखील विद्यार्थी मुलाखत घेतात त्यामुळे त्यांच्या ज्ञानात निश्चितच अनेक अनुभवाची भर पडते.
विद्यार्थ्यांच्या अनुभवी विश्वात भर पडण्यासाठी क्षेत्रभेटीचे आयोजन केले जाते. यात आसपासच्या परिसरातील सुप्रसिद्ध ठिकाणे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन दाखविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भरच पडते व ती ठिकाणे प्रत्यक्ष पाहिल्याने स्मरणात राहण्यास मदत होते.उदा. शनिवार वाडा, बँक, पोस्ट- ऑफिस, ओल्या कचऱ्यातून तयार केलेली वीजनिर्मिती इ....
पालक सभेत विद्यार्थ्यांचे विविध नाट्य तसेच पथनाट्य यांचे सादरीकरण केले जाते. यामुळे आपल्या पाल्याचे शिक्षण योग्य रीतीने व उत्तम होत आहे याची खात्री पालकांना होते. तसेच या नाट्यातून पालकांचे उद्बोधन देखील केले जाते. आपल्या पाल्याची प्रगती पाहून पालक सुखावतात.
बागेतील पालापाचोळा यापासून तसेच पटांगणावरील पडलेल्या अन्नपदार्थांचे एकत्रिकरण करून खत निर्मिती शाळेत केली जाते. याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून दिले जाते. शाळेतील एक कोपरा खास सेंद्रिय खतासाठी ठेवलेला आहे. तिथे कचरा साठवून त्याचे उत्तम खतामध्ये रूपांतर केले जाते. त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जाते आणि वृक्ष संवर्धनासाठी या खताचा उपयोग कसा केला जातो याचेही महत्त्व सांगितले जाते.
घरात टाकून दिलेल्या वस्तूंपासून टिकाऊ वस्तू आपण तयार करू शकतो याचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते व अशी वस्तू तयार करून आणण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. याचे प्रदर्शन शाळेत भरविले जाते. यामुळे प्रत्येक वस्तूचा पुनर्वापर केला जातो याचे ज्ञान विद्यार्थ्यांना होते.



विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकही सामाजिक बांधिलकी म्हणून स्वरूपवर्धिनी या संस्थेत गेले सोळा वर्ष अव्याहतपणे वर्षभर दररोज एक तास अध्यापनाचे काम करत आहे. यात विद्यार्थ्यांना अध्ययनात येणाऱ्या अडचणींचे निरसन केले जाते. तसेच पुस्तकाबाहेरील ज्ञान दिले जाते.

