भावे प्राथमिक शाळा दुबार भरते. इयत्ता पहिली व दुसरीची शाळा सकाळ विभागात व इयत्ता तिसरी व चौथीची शाळा दुपारी असते. प्रत्येक इयत्तेचे सात सात वर्ग आहेत. तसेच कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र उमेद गटाचा वर्ग आहे.सर्व वर्ग खोल्या हवेशीर ,प्रसन्न वातावरण असणाऱ्या आहेत. कल्पक फलक व बोलक्या भिंती असणारे वर्ग प्रसन्न वाटणारे आहेत.
शाळेला पुरेसे मोठे मैदान आहे. मैदानावर लंगडी, डॉजबॉल, गोलखोखो खेळ घेतले जातात. मैदानाच्या डाव्या बाजूला फुलांची, औषधी वनस्पती, फळांची झाडे आहेत .
मैदानाच्या मागील बाजूस मुलांना खेळण्यासाठी छोटीशी बाग आहे.बागेत विविध खेळणी आहेत तसेच कंपोस्ट खताचा एक प्रयोग सध्या कार्यरत आहे.
मुलांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात प्राथमिक विभागासाठी प्रयोगशाळा असणारी भावे प्राथमिक शाळा ही पहिलीच शाळा आहे.
प्रयोगशाळा रंगीबेरंगी आकर्षक आहे. छताला सूर्यमालेची प्रतिकृती साकारली आहे.
प्रत्येक इयत्तेला आवश्यक असणाऱ्या सर्व प्रयोगांचे साहित्य आहे.तसेच अनेक प्रतिकृती आहेत.
विद्यार्थी प्रयोग शाळेत प्रत्यक्ष प्रयोग करून पाहतात.