म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महान भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन माननीय मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती आत्मविश्वासाने सांगितली. विज्ञान गीत व विज्ञान घोषवाक्यांनी कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी जलशुद्धीकरण प्रकल्प, हवा जागा व्यापते, ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते, फुगा फुगविण्याचा प्रयोग, कागदी फूल पाण्यात उघडणे, चुंबकाचे आकर्षण, रंग मिसळण्याचा प्रयोग इत्यादी अनेक प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांनी प्रयोगांद्वारे विज्ञानातील संकल्पना सोप्या व मनोरंजक पद्धतीने स्पष्ट केल्या.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व सांगितले. लहान वयातच विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेत “मराठी भाषा दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस महान कवी व साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
कार्यक्रमाची सुरुवात लेझीमच्या गजरात करण्यात आली. माननीय मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
इ. १ ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून या दिवसाची शोभा वाढवली. मराठी भाषा दिनाचे महत्त्व सांगणारे मनोगत, काव्यवाचन, “शब्दकोडी ऐका व उत्तरे सांगा” हे सादरीकरण, मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे समूहगान, स्वलिखित पुस्तक निर्मिती, कुसुमाग्रजांचे मनोगत, नृत्य सादरीकरण, मराठी विनोद तसेच कविता वाचन अशा विविध कलात्मक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत रंगतदार व आनंददायी झाला. सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले.
म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेत शिवजयंतीनिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात माननीय मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.
विद्यार्थी शिवाजी महाराज, जिजामाता व मावळे यांच्या आकर्षक वेशभूषेत सहभागी झाले होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेचे महान कार्य यांची माहिती दिली. तसेच शिवरायांचे शौर्य, प्रामाणिकपणा, धैर्य व देशप्रेम हे गुण आत्मसात करण्याचा संदेश दिला.
यावेळी “शिवाजी महाराज की जय”, “हर हर महादेव”, “जय भवानी जय शिवाजी” अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा, भाषण, गाणे, गोष्ट व नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. तसेच आपल्या गड-किल्ल्यांची स्वच्छता राखणे व त्यांची जपणूक करणे हे आपले कर्तव्य असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी माननीय मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभाताई गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे, असा संदेश देण्यात आला. विद्यार्थी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांची वेशभूषा करून आले होते. विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित लघुपट दाखवण्यात आला. गाणेही दाखवण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
म. ए. सो. रेणुका परिवारात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे दिपाली मोरे (वीरपत्नी) व उपशिक्षणाधिकारी छाया महिंद्रकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘रंग दे बसंती’ या गीतावर भांगडा नृत्याचे जोशपूर्ण सादरीकरण केले. या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. या नृत्याला सौ. सारिका पोतदार व सौ. श्वेता कोंडे यांनी मार्गदर्शन केले होते. विद्यार्थ्यांनी यावेळी ‘कॉपीमुक्त परीक्षा’ ही प्रतिज्ञा घेतली. तसेच विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमास शाळेच्या महामात्रा प्रणिता जोगळेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. माननीय मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.
म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष २०२५– २६ चे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. .कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभाताई गायकवाड यांनी केले .शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी प्रमुख पाहुण्यांचा व उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला .शैक्षणिक, क्रीडा व सहशालेय उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे व मेहनतीचे सर्वत्र कौतुक झाले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे दर्शन घडले. यावर्षी 'भारतीय संस्कृती ' या विषयावर कार्यक्रम सादर करण्यात आले .यावेळी भारतातील विविध राज्यातील लोकप्रिय नृत्य प्रकार भांगडा नृत्य , राजस्थानी नृत्य , कोळीनृत्य , आदिवासी नृत्य शेतकरी नृत्य इत्यादी नृत्य प्रकार व विविधतेत एकता दर्शवणारे नाट्य सादर करण्यात आले . या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली . या समारंभाचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय डॉ. दिलीप शेठ (शाळा समिती अध्यक्ष व सदस्य – म.ए.सो. नियामक मंडळ) तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. वीणा नितीन तारकुंडे (माजी विद्यार्थी व फॅकल्टी – B.M.C.C.) मा. श्री. श्रीरंग सहस्त्रबुद्धे (माजी विद्यार्थी, ग्लोबल अॅक्सेसिबीलीटी इंजिनिअर) मा. श्री. शैलेश राऊत (माजी विद्यार्थी, प्रोजेक्ट इनचार्ज) शाळेच्या महामात्रा सौ . प्रणिता जोगळेकर उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रेणुका महाजन यांनी केले .संमेलन प्रमुख सौ .अर्चना वाघ व सौ .स्वाती रावस यांनी उपस्थितांचे आभार मानले .
म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . प्रतिभाताई गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे, असा संदेश देण्यात आला.विद्यार्थी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांची वेशभूषा करून आले होते .विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित लघुपट दाखवण्यात आला. गाणेही दाखवण्यात आले .
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी मा. कर्नल जनार्दन रामचंद्र खाडिलकर व कॅप्टन किरण जोशी ,शाळेचे हितचिंतक श्री . गोविंद मिश्रीलाल केला , सौ . मुग्धा केला व शाळेच्या महामात्रा डॉ. मानसी ताई भाटे उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड यांनी ध्वजप्रतिज्ञा सांगितली. विद्यार्थ्यांनी ध्वजगीत व समूहगीत सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दिपाली कुलकर्णी यांनी केले, तर श्रीमती रेणुका महाजन यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. मानसी भाटे यांच्या हस्ते पाहुण्यांचा व मान्यवरांचा सत्कार झाला.
आदित्य गटातील कु. तन्वी मोटे हिने शूरवीर कनकलताची सुंदर गोष्ट सांगितली.शौर्य नाझरे याने तिरंगी झेंड्याची माहिती सांगितली . सौ. शुभांगी आठल्ये यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व उलगडून सांगितले. ‘एक मुष्टी धान्य दान’ या उपक्रमांतर्गत जमा झालेला तांदूळ वनवासी कल्याण आश्रमाला सुपूर्त करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद, सावरकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, इंदिरा गांधी, झाशीची राणी लक्ष्मीबाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेतून त्यांच्याविषयी माहिती दिली. तसेच आकर्षक कवायत सादर करून सर्वांचे मन जिंकले.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
माननीय उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी उपस्थितांचे आभार मानले . या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंदी, रंगतदार आणि देशभक्तीने ओथंबलेल्या वातावरणात हा सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.


































