बातमी

म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. योग केल्यामुळे शरीर व मन निरोगी राहते तसेच एकाग्रता, शिस्त आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर केली. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांना योग साधनेची आवड निर्माण व्हावी यासाठी योग गीतही ऐकविण्यात आले. प्रमुख पाहुण्या प्रा. रूपा जोशी यांनी विद्यार्थ्यांना योगसाधनेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी वृक्षासन, ताडासन, वज्रासन तसेच विविध व्यायाम प्रकार यांची प्रात्यक्षिके स्वतः करून दाखवली व विद्यार्थ्यांकडून करून घेतली. तसेच त्यांनी योग दिनाची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना सांगितली व सर्व विद्यार्थ्यांकडून ती म्हणून घेतली. यावेळी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवतांडव स्तोत्राच्या तालावर सूर्यनमस्कार व विविध योगासने यांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाच्या शेवटी माननीय मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांच्या सहभागाचे कौतुक केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये योग साधनेविषयी जागरूकता निर्माण करून निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.

म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. योग केल्यामुळे शरीर व मन निरोगी राहते तसेच एकाग्रता, शिस्त आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर केली. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांना योग साधनेची आवड निर्माण व्हावी यासाठी योग गीतही ऐकविण्यात आले.
प्रमुख पाहुण्या प्रा. रूपा जोशी यांनी विद्यार्थ्यांना योगसाधनेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी वृक्षासन, ताडासन, वज्रासन तसेच विविध व्यायाम प्रकार यांची प्रात्यक्षिके स्वतः करून दाखवली व विद्यार्थ्यांकडून करून घेतली. तसेच त्यांनी योग दिनाची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना सांगितली व सर्व विद्यार्थ्यांकडून ती म्हणून घेतली.
यावेळी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवतांडव स्तोत्राच्या तालावर सूर्यनमस्कार व विविध योगासने यांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाच्या शेवटी माननीय मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांच्या सहभागाचे कौतुक केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये योग साधनेविषयी जागरूकता निर्माण करून निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.

 

शाळेचे सुयश

एम व्ही एम परांजपे मराठी प्राथमिक विद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या “लोकनृत्य स्पर्धेमध्ये” अ गटामध्ये १९ संघ उपस्थित होते यामधून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेला तृतीय क्रमांक मिळाला आहे. विद्यार्थिनींनी गोंधळ ( लख्ख पडला प्रकाश ) या गीत प्रकारावर नृत्य सादर केले. नृत्य दिग्दर्शन सौ.श्वेता कोंडे व सौ.वीणा शिंदे यांनी केले होते . मा.मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड , मा.उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी विद्यार्थीनींचे कौतुक केले.

शाळेचे यश

म.ए.सो.बालशिक्षण ,डेक्कन आयोजित ‘व . पु .काळे कथाकथन  स्पर्धेत ‘भावे प्राथमिक शाळेची  विद्यार्थिनी कु.मानसी आमडेकर हिने कथाकथनाचा प्रथम ‘व.पु.काळे पुरस्कार ‘मिळविला आहे . या स्पर्धेत ५० स्पर्धक सहभागी झाले होते . या विद्यार्थीनीला  सहशिक्षिका रेणुका महाजन यांनी मार्गदर्शन केले होते .  मा.मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड , मा.उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी मानसीचे कौतुक केले.

शाळेचे यश

महाराष्ट्र  एज्युकेशन सोसायटीची भावे प्राथमिक शाळा , पुणे आणि १९८८ इ . ४ थी अ चे माजी विद्यार्थी सहआयोजित आशिष चांदोरकर स्मृती करंडक आंतरशालेय  नाट्यवाचन स्पर्धेमध्ये इ. १ ली ते ४थी या गटामध्ये म . ए . सो . भावे प्राथमिक शाळेला तृतीय क्रमांक  मिळाला आहे .या स्पर्धेत इ.४थी आदित्य गटातील कु.मानसी आमडेकर  या विद्यार्थीनीला  उत्कृष्ट वाचक पुरस्कार मिळाला आहे .  या सर्वांना  सहशिक्षिका श्रीमती रेणुका महाजन यांनी मार्गदर्शन केले होते .    मा.मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड , मा.उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

शाळेचे यश

West Bengal, saltlake city ,येथे झालेल्या ,open nation climbing championship मध्ये 10 ते 14 वयोगटात lead climbing मध्ये ध्रुवी पडवळ इ.4थी दिवाकर गट हिला रौप्य पदक मिळाले.ध्रुवीचे खूप खूप अभिनंदन .

Scroll to Top