2026-27
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे शाळेत स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा आकर्षक पद्धतीने सुशोभित करण्यात आली होती. या प्रसंगी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासाची संस्मरणीय सुरुवात म्हणून त्यांच्या हातांचे ठसे घेण्याचा उपक्रमही राबविण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर, शाळेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे उपस्थित होत्या . माननीय मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे तसेच माननीय उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. या स्वागत समारंभामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आपुलकी, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सहभागामुळे कार्यक्रम आनंददायी व संस्मरणीय ठरला. 📚🌸🎉
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत ‘पावनखिंड दौड’ उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन.
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत 'पावनखिंड दौड' उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये इतिहासप्रेम, देशभक्ती आणि शौर्याची प्रेरणा जागविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या नियोजनातून आयोजित या उपक्रमात इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
उपक्रमाची सुरुवात 'पावनखिंड' ही ऐतिहासिक चित्रफित दाखवून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमावर आधारित प्रभावी नाट्यीकरण सादर केले. तसेच बाजीप्रभूंचा जोशपूर्ण पोवाडा सादर करून उपस्थितांमध्ये शौर्याची भावना जागृत केली. विद्यार्थ्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची आकर्षक चित्रे रंगवून आपल्या कलागुणांचाही उत्कृष्ट आविष्कार घडविला.
यावेळी इतिहास अभ्यासक श्री. अनिकेत यादव यांनी पावनखिंड आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय शौर्याची प्रेरणादायी कथा विद्यार्थ्यांना सांगितली. त्यांच्या ओघवत्या कथनातून विद्यार्थ्यांना स्वराज्याच्या इतिहासाची आणि बलिदानाची प्रेरणादायी ओळख झाली.
मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या प्रोत्साहनामुळे भावे प्राथमिक शाळेने हुजूरपागा कला करंडक अंतर्गत घेण्यात आलेल्या शिक्षक समूहगीत स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत भावे प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी एकूणात तृतीय क्रमांक पटकावला.
या समूहगीताचे लेखन व स्वरसंयोजन सौ. गौरी जोशी यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी समूहगीताचे सुंदर सादरीकरण केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे, मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे भावे प्राथमिक शाळेने हुजूरपागा कला व क्रीडा करंडक अंतर्गत घेण्यात आलेल्या नाट्यछटा व कथाकथन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
इयत्ता १ली व २री गटाच्या नाट्यछटा स्पर्धेत इयत्ता २री, निसर्ग गटातील श्रीशा शंकर हाटकर हिने एकूणात प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच कथाकथन स्पर्धेत १५० स्पर्धकांमधून इयत्ता ३री, अश्विनी गटातील प्रार्थना कस्तुरे हिने उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक पटकावला. याच स्पर्धेत इयत्ता ४थी, आदित्य गटातील गार्गी खोपडे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
या विद्यार्थिनींना श्रीमती रेणुका महाजन, सौ. अनिता जगदाळे व सौ. शुभदा शिरोडे यांनी मार्गदर्शन केले होते .
या उल्लेखनीय यशाबद्दल शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे, मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विजेत्या विद्यार्थिनी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी, मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून फुलला वृक्षारोपण सोहळा
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या संकल्पनेतून साकार झालेला 'पर्यावरणपूरक पंढरीची वारी ' हा अभिनव उपक्रम म .ए .सो.भावे प्राथमिक शाळा येथे उत्साहात संपन्न झाला . शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे , डॉ. उमेश बिबवे (संचालक, क्रीडा विभाग, म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शाळेचे माजी विद्यार्थी, प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापिका सौ . ललिता कारंडे तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या आवारात गुलाब, कोरफड, कडुलिंब, गवती चहा, ओवा, लिंबू, शतावरी आणि बेल या औषधी व उपयुक्त वनस्पतींची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनीही या रोपांचे संगोपन करून पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घेण्याची प्रतिज्ञा केली.
संस्थेने माजी विद्यार्थ्यांना पंढरीच्या वारीच्या मार्गावर किंवा ज्या ठिकाणी त्यांना शक्य होईल त्या ठिकाणी एक भारतीय वंशाचे झाड लावण्याचे आवाहन केले . या उपक्रमामुळे शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे शाळेशी असलेले भावनिक नाते अधिक दृढ होण्यास मदत झाली. हरित वारी घडवूया .... निसर्ग जपूया.....आणि आपल्या शाळेशी व संस्थेशी पुन्हा एकदा नातं दृढ करूया !हा संदेश माजी विद्यार्थ्यांना देण्यात आला .माजी विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमास भरघोस प्रतिसाद दिला . यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारी प्रभावी भाषणे सादर केली तसेच वृक्षारोपणावर आधारित गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
माननीय मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व माननीय उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनापासून कौतुक करत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होण्यास मदत झाली. तसेच वृक्षारोपणाच्या माध्यमातून निसर्गप्रेम, पर्यावरणाबद्दलची सामाजिक जबाबदारी अधिक दृढ करण्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी) २०२५-२६ मध्ये म. ए. सो. भावे प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ, पुणे येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत मानाचा तुरा खोवला आहे.
या परीक्षेत शाळेचे चार विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून, या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
🌟 गुणवंत विद्यार्थी
🔹 सार्थक दत्तु खाडे — २४२ गुण
➡️ जिल्ह्यात १५५ वा क्रमांक
🔹 यश रघुनाथ कदम — २३८ गुण
➡️ जिल्ह्यात १९१ वा क्रमांक
🔹 स्वरांजली योगेश जाधव — २३६ गुण
➡️ जिल्ह्यात २०८ वा क्रमांक
🔹 वेदांत सचिन इंदलकर — २३६ गुण
➡️ जिल्ह्यात २१९ वा क्रमांक
या विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, पालकांचे सहकार्य तसेच शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. या सर्व विद्यार्थ्यांना श्रीमती रेणुका महाजन यांनी मार्गदर्शन केले होते .
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माननीय मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे, माननीय उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार, शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे ,सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती रेणुका महाजन यांचे अभिनंदन केले.
शिष्यवृत्ती परीक्षेसारख्या स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे आणि शाळेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक मार्गदर्शनाचे प्रतीक आहे.
💐 सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन! 💐
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी शिक्षकांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्याची व समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनीही अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी गोष्टी सांगून त्यांच्या कार्याला उजाळा दिला.
अहिल्याबाई होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य, कर्तव्यनिष्ठा, न्यायप्रियता आणि समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी धैर्य, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवेची प्रेरणा घ्यावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.
शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ व महामात्रा डॉ. मानसी भाटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या महान कार्याची ओळख झाली आणि त्यांच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेण्याची संधी मिळाली.
भावे प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर, पालक व उपस्थितांचे स्वागत करून झाली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रमुख पाहुण्या सौ. उत्तरा राजेंद्र वालेकर (माजी विद्यार्थिनी), भारतीय वायुसेना – सिव्हिलियन गॅझेटेड ऑफिसर (इक्विपमेंट) आणि प्रमुख पाहुणे श्री. डॉ. निलेश दरवडे (माजी विद्यार्थी, ऑर्थोपेडिक सर्जन, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे , मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे, उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार तसेच शिक्षक, पालक आणि आजी - माजी विद्यार्थी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी ध्वज प्रणाम, राष्ट्रगीत, ध्वजगीत ,कौमी नारे व समूहगीत सादर केले. शाळेत ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट क्रांतिसप्ताह साजरा करण्यात आला .यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी ‘क्रांतिकारक’ या हस्तलिखिताचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या हस्तलिखितातून विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या शौर्याची ओळख करून दिली.
विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकाची गोष्ट सांगितली व भूमिगत क्रांतिकारक यांची वेशभूषा अभिरूप स्वरूपात केली होती . विद्यार्थ्यांनी इंग्रजी संवाद प्रभावीपणे सादर केला. ‘धान्य दान’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी वनवासी कल्याण आश्रमाला तांदूळ देऊन सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्याच्या तालावर पॉम-पॉम हातात घेऊन सादरीकरण केले . तसेच विविध कवायत प्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मंथन परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व, देशप्रेम, शिस्त आणि राष्ट्राप्रती कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत श्रावणी शुक्रवार उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थी पारंपरिक व रंगीत वेशभूषेत नटून-थटून शाळेत आले होते. विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण शाळेचे वातावरण आनंदमय झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवी व जीवतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. माननीय मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व आरती करण्यात आली.शाळा समिती अध्यक्ष डॉ . दिलीप शेठ व डॉ .मानसी भाटे यावेळी उपस्थित होते .
श्रावणी शुक्रवारनिमित्त शाळेत सत्यनारायण महापूजेचेही आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती, परंपरा व सणांचे महत्त्व समजावून देण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले .सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले . शाळेतील पदाधिकारी, शिक्षकवृंद व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची भावे प्राथमिक शाळा, पुणे आणि १९८८ सालचे इयत्ता ४ थी (अ) चे माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आशिष चांदोरकर स्मृती करंडक आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेत भावे प्राथमिक शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली.
इयत्ता १ ली ते ४ थी गटामध्ये झालेल्या या स्पर्धेत भावे प्राथमिक शाळेने तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील कु. आरोही पाठक हिने उत्कृष्ट सादरीकरण करून ‘उत्कृष्ट वाचक’ हा पुरस्कार पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांना श्रीमती रेणुका महाजन यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे, मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व मा. उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती रेणुका महाजन यांचे कौतुक केले.
भावे प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करत असते. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य, आत्मविश्वास व सर्जनशीलता व्यक्त करण्याची संधी मिळत असून, शाळा अशा विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेत सामाजिक रक्षाबंधन उपक्रम उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मेळघाट येथील आदिवासी बांधवांनी बांबूपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक राखी साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी आकर्षक राख्या तयार केल्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या राख्यांचे शाळेत प्रदर्शन भरविण्यात आले. या पर्यावरणपूरक राख्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांना व सेवाभावी व्यक्तींना बांधण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दररोज त्यांना शाळेत आणणे व घरी सुरक्षित पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या व्हॅनचालक काकांना विद्यार्थिनींनी राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पुणे महानगरपालिका अग्निशामक दलातील जवानांना राखी बांधून त्यांच्या धाडसी व समाजाच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या महत्त्वपूर्ण कार्याला मानवंदना देण्यात आली.
याचबरोबर पुणे विद्यार्थी गृह येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना राखी बांधून बंधुभावाचा संदेश देण्यात आला. सामाजिक रक्षाबंधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञता, सामाजिक बांधिलकी, बंधुभाव आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमाचे शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे, मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे आणि उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले.
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा तसेच संतुलित आहाराचे महत्त्व समजावे, या उद्देशाने ‘पुस्तक हंडी’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमीचे महत्त्व सांगत श्रीकृष्णाची प्रेरणादायी गोष्ट सांगितली. श्रीकृष्णाच्या गीतांवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त नृत्य सादर केले तसेच कृष्णाची गाणी गायली.
याप्रसंगी रंगभरण स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाचे चित्र अतिशय सुंदर व आकर्षक रंगांनी रंगवून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्साहात ‘पुस्तक हंडी’ फोडून त्यातील गोष्टींची पुस्तके मिळवली. विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन करून आनंद घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी, हा उद्देश साध्य झाला.
या पुस्तक हंडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संतुलित आहाराचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, यासाठी हंडीमध्ये कडधान्ये, विविध फळभाज्या व पालेभाज्यांची चित्रे ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांना आहारात डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या व फळांचा योग्य प्रमाणात समावेश करण्याचे महत्त्व सांगण्यात आले. पौष्टिक व संतुलित आहारामुळे शरीराची योग्य वाढ होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच अभ्यास व खेळासाठी आवश्यक ऊर्जा मिळते, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
माननीय मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांनी विद्यार्थ्यांनी नियमित पुस्तकांचे वाचन करून आपले ज्ञान वाढवावे तसेच निरोगी राहण्यासाठी संतुलित व पौष्टिक आहार घ्यावा, असा संदेश दिला.
शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे आणि उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत शिक्षक दिनानिमित्त ‘पाटी-दप्तरा शिवाय शाळा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मा . मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, या दिवशी शाळेच्या कामकाजाची संपूर्ण सूत्रे विद्यार्थ्यांनी आपल्या हाती घेतली. विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच शिक्षकांच्या भूमिका साकारत शाळेचे दैनंदिन कामकाज अनुभवले. दुसरीच्या विद्यार्थ्यांनी बालवाडीच्या वर्गात जाऊन छोट्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. मोठ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका निभावत लहान मुलांना शिकवण्याचा अनोखा आनंद अनुभवला.
अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी विविध सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पपेट शो, कागदकाम, मातीकाम, चित्रकला व रंगभरण अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे नेहमीच्या पाटी-दप्तराच्या चौकटीबाहेर जाऊन विद्यार्थ्यांना कृतीतून शिकण्याची, नेतृत्वाची आणि जबाबदारी घेण्याची संधी मिळाली.
‘पाटी-दप्तरा शिवाय शाळा’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सर्जनशीलता आणि सहकार्याची भावना विकसित होण्यास मदत झाली. शिक्षक दिनाचा उत्सव केवळ औपचारिक न ठेवता विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या भूमिकेचा प्रत्यक्ष अनुभव देणारा हा उपक्रम ठरला.
या उपक्रमाचे शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ ,महामात्रा डॉ. मानसी भाटे, मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे आणि उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी कौतुक केले.
मा . मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या प्रोत्साहनामुळे म. ए. सो. भावे प्राथमिक शाळा विविध कला व क्रीडा स्पर्धांमध्ये सातत्याने उत्स्फूर्त सहभाग घेत आहे. हुजूरपागा कला व क्रीडा करंडक स्पर्धेत लोकनृत्य प्रकारात भावे प्राथमिक शाळेने तृतीय क्रमांक पटकावला आहे .
विद्यार्थिनींनी यावेळी बहारदार लोकनृत्य सादर केले. या सादरीकरणासाठी सौ. श्वेता कोंडे व सौ. वीणा शिंदे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले होते.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे, मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे भावे प्राथमिक शाळेने हुजूरपागा कला व क्रीडा करंडक अंतर्गत घेण्यात आलेल्या नाट्यछटा व कथाकथन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
इयत्ता १ली व २री गटाच्या नाट्यछटा स्पर्धेत इयत्ता २री, निसर्ग गटातील श्रीशा शंकर हाटकर हिने एकूणात प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच कथाकथन स्पर्धेत १५० स्पर्धकांमधून इयत्ता ३री, अश्विनी गटातील प्रार्थना कस्तुरे हिने उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक पटकावला. याच स्पर्धेत इयत्ता ४थी, आदित्य गटातील गार्गी खोपडे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
या विद्यार्थिनींना श्रीमती रेणुका महाजन, सौ. अनिता जगदाळे व सौ. शुभदा शिरोडे यांनी मार्गदर्शन केले होते .
या उल्लेखनीय यशाबद्दल शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे, मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विजेत्या विद्यार्थिनी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या प्रोत्साहनामुळे भावे प्राथमिक शाळेने हुजूरपागा कला करंडक अंतर्गत घेण्यात आलेल्या शिक्षक समूहगीत स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत भावे प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी एकूणात तृतीय क्रमांक पटकावला.
या समूहगीताचे लेखन व स्वरसंयोजन सौ. गौरी जोशी यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी समूहगीताचे सुंदर सादरीकरण केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे, मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन केले.




























































