हुजूरपागा कला व क्रीडा करंडक स्पर्धेत म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेचे यश

मा . मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या प्रोत्साहनामुळे म. ए. सो. भावे प्राथमिक शाळा विविध कला व क्रीडा स्पर्धांमध्ये सातत्याने उत्स्फूर्त सहभाग घेत आहे. हुजूरपागा कला व क्रीडा करंडक स्पर्धेत लोकनृत्य प्रकारात भावे प्राथमिक शाळेने तृतीय क्रमांक पटकावला आहे .
विद्यार्थिनींनी यावेळी बहारदार लोकनृत्य सादर केले. या सादरीकरणासाठी सौ. श्वेता कोंडे व सौ. वीणा शिंदे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले होते.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे, मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Scroll to Top