पूर्व प्राथमिक विभाग मराठी माध्यम
- खेळवाडी
- छोटा गट
- मोठा गट
प्राथमिक विभाग सेमी इंग्रजी
सकाळ विभाग
इयत्ता पहिली व दुसरी – 7.10 ते 11.45 (चौदा वर्ग )
दुपार विभाग
इयत्ता तिसरी चौथी – 12 ते 5.10 (चौदा वर्ग )
गटांची / तुकड्यांची रचना
इयत्ता पहिलीच्या ७ गटांना कमळ फुलाची नावे दिली आहेत.
- पंकज
- नीरज
- सरोज
- राजीव
- पुष्कर
- पद्म
- कमळ
इयत्ता दुसरीच्या ७ गटांना निसर्ग व ऋतुंची नावे दिली आहेत.
- निसर्ग
- वसंत
- ग्रीष्म
- वर्षा
- शरद
- हेमंत
- शिशिर
इयत्ता तिसरीच्या ७ गटांना नक्षत्रांची नावे दिली आहेत.
- अनुराधा
- अश्विनी
- आश्लेषा
- रेवती
- पूर्वा
- चित्रा
- स्वाती
इयत्ता चौथीच्या ७ गटांना सूर्याची नावे दिली आहेत.
- दिनमणी
- दिनकर
- दिवाकर
- भास्कर
- आदित्य
- रवि
- भानू
उमेद विभाग (कर्णबधिर युनिट)
अपंग एकात्म शिक्षण योजना – कर्णबधिर युनिट ( उमेद गट)
इतिहास
- सदर योजना शाळेत 1976 साली कै. प्र. ल. गावडे यांच्या प्रयत्नाने सुरू झाली. सुरवातीला एकच युनिट होते. सुप्रिया वष्ट व बापट बाईंनी या युनिटचे काम पाहिले. काही वर्षांनी दुसरे युनिट सुरू झाले.
- आतापर्यंत 100 पेक्षा जास्त विद्यार्थी या योजनेतू शिकून बाहेर पडले आहेत व यशस्वीपणे आपल्या नोकरी व व्यवसायात कार्यरत आहेत.
- एका विशेष शिक्षिकेला 8 विद्यार्थी असा सरकार मान्य आकडा असतो
- सन 2022-23 मध्ये पहिली ते चौथीची मिळून 13 विद्यार्थी आहेत.
- विशेष शिक्षिका म्हणून वृंदा पंडित कार्यरत आहेत.
योजनेचा उद्देश
- कर्णबधिर विद्यार्थ्यांना पहिल्या पासूनच मुख्य प्रवाहात आणणे.
- सर्व समावेशित शिक्षण देणे.
योजनेची कार्यवाही
- कर्णबधिर विद्यार्थी अर्धा वेळ इयत्तेनुसार वर्गात बसतात. अर्धा वेळ उमेद गटात ( विशेष गटात) बसतात.
- वर्गात त्या त्या इयत्तेनुसार अभ्यासक्रम पूर्ण करतात. वर्गाच्या सर्व उपक्रमात सहभागी होतात.
- उमेदगटात अभ्यासक्रमात न समजलेला भाग, अडचणी तसेच भाषावाढ, वाचा दुरूस्ती, संकल्पनांचे दृढीकरण व अभ्यास पुरक गोष्टींवर भर दिला जातो.
- उमेद गटात एकास एक पध्दतीने व काही वेळा गटात काम केले जाते.
- माजी विद्यार्थी,पालक, शिक्षक यांचे मार्गदर्शन घेतले जाते.
- पाल्याच्या संदर्भात पालकांशी वेळोवेळी संवाद साधला जातो त्यांना मार्गदर्शन केले जाते.