-
- शाळेचे संस्थापक -: कै.वासुदेव बळवंत फडके,कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर, कै.वामन प्रभाकर भावे.
- शाळेचे सध्याचे नाव -: म.ए.सो.भावे प्राथमिक शाळा
- शाळेची स्थापना -: १ जानेवारी १८९६.
- शाळेचे पूर्वीच नाव :– “पुणे नेटिव्ह इन्स्टिट्युशन -मराठी शाळा”. १८९६ मध्ये शाळेचे पहिले मुख्या.
मा.श्री.क्षीरसागर होते ,त्यांच्या सोबत ८ शिक्षकांचा स्टाफ होता. - सन १९२३ मध्ये :- नानावाड्याजवळील संस्थेच्या मालकीच्या इमारतीत शाळा भरु लागली. शाळेची प्रगती पाहून सदाशिव पेठेत स्थलांतर झाले.त्यावेळी शाळेच नाव ” सदाशिव पेठ मराठी शाळा ” असे ठेवण्यात आले.
- १९ आँक्टो.१९३१ :- सध्याच्या दगडी इमारतीत शाळा सुरु झाली.तेव्हा शाळेचे नाव संस्थापक कै. वामन भावे यांच्या स्मरणार्थ शाळेचं नाव “भावे प्राथमिक शाळा” देण्यात आले.
- सन १९६२/६३ :- भरतनाट्य मंदिरामागे दुमजली इमारत बांधण्यात आली. त्याला लागून असलेले खेळासाठीचे स्वतंत्र मैदान पूर्वीपासून होते.त्याला “गूळखोबर्याचे पटांगण” म्हणून ओळखले जात असे.या इमारतीत तळमजल्यावर ३ भावेप्राथमिकचे वर्ग व रेणुका स्वरुप शाळेसाठी गायन हाॅल व चित्रकला हाॅल अशी रचना होती.पण १९८८ मध्ये धोकादायक असल्याने ही इमारत उतरवण्यात आली.
- २३ जाने.१९४९ :- शाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला.
- सन १९८३ :- सध्याच्या सुसज्ज सभागृहाची पायाभरणी ४मे १९८३ रोजी झाली.१मे १९८५ रोजी संस्थेचे उपाध्यक्ष डाॅ.आ.भै.जोशी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
- सन २०२१/२२ :- शाळेचा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा झाला.(२०२०/२१ मध्ये कोविड परीस्थितीमुळे एक वर्ष उशीरा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा झाला.) यावेळी शाळेत माजी विद्यार्थी मेळावे घेतले गेले. “मराठी बाणा” हा सांस्कृतिक कार्यक्रमातून 23 लाख एवढे निधीसंकलन केले गेले.
शाळेचे आत्तापर्यंतचे मुख्याध्यापक :-
श्री.क्षीरसागर, श्री.सदाशिव रामचंद्र गाडगीळ, श्री.वि.ना.उमराणी, श्री.वा.शि.ठोसर, श्री.ल.ना.भावे, श्री.वि.के. खासनीस, श्री.वि.दि.जोगळेकर, श्री.ग.वा.पेंडसे,श्री.वा.प.दातार, श्री.पं.वि.चिंचोरे, सौ.विद्यादेवी काणे,सौ.शालिनी मोकाशी, सौ.शैलजा लिमये,सौ.मिनाक्षी अभंगराव आणि सौ. उज्ज्वला गायकवाड व श्री.अनिल खिलारे
सौ.लिमये यांच्या कारकीर्दीत १९८० ते १९८१ या काळात श्री.मंगला आपटे आणि सौ.गायकवाड यांच्या काळात अल्पकाळासाठी सौ.अलका जोशी यांनी मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले.
सध्या सौ.प्रतिभा गायकवाड हे यशस्वीपणे भावे प्राथमिकचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.यांच्या कारकीर्दीत शाळेने अभ्यास तसेच अभ्यासेतर सर्वच उपक्रमांत स्पृहणीय असे यश संपादन करत आहे.