म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात माननीय मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून केली. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दोन्ही नेत्यांचे जीवनकार्य, विचार व कार्यतत्त्वे यांची माहिती देत त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी मूल्यांचा परिचय करून दिला.
विद्यार्थ्यांनी गांधीजी व शास्त्रीजींच्या जीवनावर आधारित प्रसंगांचे नाट्यरूपांतर सादर केले. यातून सत्य, अहिंसा, स्वदेशी वस्तूंचा वापर, स्वच्छतेचे महत्त्व तसेच श्रमदानाची जाणीव याविषयी प्रभावी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी वर्गखोली व शाळा परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेची सवय अंगीकारण्याचा संकल्प केला.या उपक्रमाचे कौतुक करत माननीय मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भोंडल्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही उत्साहाने सहभाग घेतला.आपले सण समारंभ कुटुंबात एकत्रितपणे साजरे करावेत. त्यात सगळ्यांचा सहभाग असावा. कुटुंबातील एकोपा वाढीस लागावा या हेतूने कुटुंब प्रबोधन उपक्रमा अंतर्गत पालकांचा व मुलांचा सह भोंडला आयोजित केला होता.
विद्यार्थ्यांनी व पालकांनी “ एक लिंबू झेलू बाई”, “ऐलोमा पैलोमा”, “आज कोण वार बाई”, “नणंद भावजया दोघीजणी” अशी पारंपारिक भोंडल्याची गाणी म्हणत आनंदाने फेर धरला. भोंडल्यानंतर खिरापत ओळखण्यात आली व सर्वांनी खिरापतीचा आस्वाद घेतला. पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहाने सहभागी झाल्यामुळे पालक–शिक्षक संबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली.
याच दिवशी विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त पाटीपूजन व सरस्वती पूजन केले. शाळा झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजविण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांन महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे पठण करून वातावरण भक्तिमय केले.
मा . मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पालकांचे आभार मानले .या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत शिक्षक दिनाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा वेश परिधान करून वर्गात जाऊन अध्यापनाचा अनुभव घेतला. छोट्या-छोट्या शिक्षकांनी घेतलेले धडे पाहून सर्वत्र आनंदाचे व कौतुकाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात माननीय मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यानंतर उपस्थित शिक्षकांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती दिली. त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आदर्श नागरिक बनण्याचा संदेशही देण्यात आला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘पाटी-दप्तराशिवाय शाळा’ राबविण्यात आली. पुस्तकांच्या ओझ्यातून मुक्त होऊन विद्यार्थ्यांनी क्ले मातीपासून आकर्षक वस्तू तयार केल्या .पानांचा गणपती साकारला . रांगोळीने शाळेचा परिसर उजळून टाकला. रंग, आकार आणि सर्जनशीलतेच्या या मेजवानीत चिमुकल्यांनी मनसोक्त आनंद लुटला.
शिक्षक दिनाचा हा उत्सव केवळ आनंदाचा नव्हे तर गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि महान शिक्षकांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा एक संस्मरणीय क्षण ठरला. भावे प्राथमिक शाळेत दिवसभर उत्साह, आनंद व सर्जनशीलतेची रंगतदार उधळण पाहायला मिळाली .
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत शिक्षक दिनाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला.चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा वेश परिधान करून वर्गात जाऊन अध्यापनाचा अनुभव घेतला. छोट्या-छोट्या शिक्षकांनी घेतलेले धडे पाहून सर्वत्र आनंदाचे व कौतुकाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात माननीय मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यानंतर उपस्थित शिक्षकांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती दिली. त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आदर्श नागरिक बनण्याचा संदेशही देण्यात आला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘पाटी-दप्तराशिवाय शाळा’ राबविण्यात आली. पुस्तकांच्या ओझ्यातून मुक्त होऊन विद्यार्थ्यांनी क्ले मातीपासून आकर्षक वस्तू तयार केल्या .पानांचा गणपती साकारला . रांगोळीने शाळेचा परिसर उजळून टाकला. रंग, आकार आणि सर्जनशीलतेच्या या मेजवानीत चिमुकल्यांनी मनसोक्त आनंद लुटला.
शिक्षक दिनाचा हा उत्सव केवळ आनंदाचा नव्हे तर गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि महान शिक्षकांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा एक संस्मरणीय क्षण ठरला. भावे प्राथमिक शाळेत दिवसभर उत्साह, आनंद व सर्जनशीलतेची रंगतदार उधळण पाहायला मिळाली .
दरवर्षीप्रमाणे यंदाही म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. शाळेतील चिमुकल्यांनी आनंदाने बाप्पाचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी श्रीगणेश पंचरत्न स्तोत्र व गणपती अथर्वशीर्षाचे सुस्वरात पठण केले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ‘गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा’ ही गोष्ट सांगितली, तर विद्यार्थ्यांनी याचे नाट्यरूपात सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली. यावेळी चिमुकल्यांनी गणपतीवर आधारित गोष्टी सांगितल्या, नृत्यातून गणेश वंदना सादर केली. गणेशगीतांनी वातावरण भारावून टाकले.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाकडे “सर्वांना सुखी
ठेवावे” अशी भावनिक मागणी केली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रसादाचे वाटप करण्यात आले. सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह, भक्तीभाव आणि आनंदी जल्लोष अनुभवायला मिळाला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेत दहीहंडीचा उत्साहपूर्ण सोहळा साजरा करण्यात आला. यावर्षी दहीहंडी उत्सवाला आगळावेगळा शैक्षणिक रंग देण्यात आला .विद्यार्थ्यांनी प्रतिकात्मक पुस्तकहंडी फोडून शिक्षण व ज्ञानाची गोडी जोपासण्याचा संदेश दिला. कार्यक्रमादरम्यान मुलांनी विविध गीते, नृत्य , घोषवाक्ये आणि पारंपारिक पोशाखातून उत्सवाला रंगत आणली.
शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. प्रतिभा गायकवाड आणि उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व सहभागाचे कौतुक केले .
शाळेच्या परिसरात आनंद, उत्साह आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले होते. पुस्तकहंडी फोडण्याच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संस्कारांसह शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले.या उपक्रमातून मुलांना एकतेचे महत्त्व , शिक्षणाची गोडी आणि सहकाराचे बळ समजले
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमापूजनाने झाली.टिळकांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाविषयी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली व या दोन्ही महान व्यक्तींचे कार्य आदर्श म्हणून विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी गीत, पोवाडे व घोषवाक्यांच्या माध्यमातून या महान व्यक्तींचे कार्य व विचार सादर केले . लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित भाषणे, वेशभूषा सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले .
म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेतीलउपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांनाही यावेळी त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले .त्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करत आहेत त्यामुळे त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहेत .त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला .
म . ए . सो .भावे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड , सर्व शिक्षक व पालक या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त विविध प्रयोगांचे सादरीकरण केले .इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी हवेचा दाब , पाण्याची घनता , पवनचक्की , ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते , तरंगणे - बुडणे , ध्वनीचे वहन असे विविध वैज्ञानिक प्रयोग सादर केले . विद्यार्थ्यांनी प्रयोगाचे साहित्य , प्रयोगाची कृती सांगून प्रयोगातील संकल्पनाही
सांगितल्या . हे सर्व प्रयोग वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले . मा .मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व मा . उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .
म.ए.सो .भावे प्राथमिक शाळेत पहिल्यांदाच एक प्रयोग करण्यात आला . सध्या जीवनशैली इतक्या झपाट्याने बदलत आहे की छोटी चिमुरडी इतक्यात मोठी झाली हे कळलंच नाही . म्हणूनच बदलत्या काळानुसार आपल्या शाळेतील मुलांना, पालकांना सजग करणे हे आपले ध्येय आणि यातूनच साकारले आई ! मी मोठी होत आहे.हे सत्र . मुलींच्या माता पालकांना याबद्दल जागृत करून मायलेकींचं नातं सुदृढ करणारे, वाढत्या वयाकडे सकारात्मकतेने बघण्याचे दृष्टिकोन देणारे हे सत्र व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे घेण्यात आले. यात गिरिजा लिखिते मॅडम व सुरेखा नंदे मॅडम यांनी मार्गदर्शन केले .पालकांच्या प्रतिक्रिया ही अतिशय बोलक्या होत्या. त्यांच्या बऱ्याच शंकांचे निरसनही यात करण्यात आले. आजचे सत्र अतिशय महत्वाचे आणि आमच्यासाठी उपयुक्त होते .अशा प्रतिक्रिया ही पालकांनी दिल्या. या कार्यक्रमाला माननीय मुख्याध्यापिका सौ. प्रतिभाताई गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ.वृषालीताई ठकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विशेष पारितोषिक मिळविणार्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका सौ. आदिती आठवले तसेच वादक या सर्वांचे मा . मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व मा . उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी कौतुक केले.
या उपक्रमाचे उद्घाटन म .ए सो .भावे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मा . सौ .प्रतिभा गायकवाड यांनी केले .त्यांनी विद्यार्थ्यांना व्यवहार कौशल्याचे महत्व सांगितले . स्टॉलला भेट देऊन खरेदीही केली व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले .
पुस्तकातील ज्ञानाचे प्रत्यक्ष उपयोजन व्हावे व विद्यार्थ्यांमध्ये दैनंदिन जीवनात गरजेचे असणारे व्यवहार कौशल्य आत्मसात व्हावे या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे आर्थिक नियोजनाचे महत्त्व समजले . माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .या उपक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
म .ए .सो . भावे प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांनी सूर्यनमस्कार घातले .शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व सांगितले व रोज सूर्यनमस्कार घालण्यास सांगितले .विद्यार्थ्यांच्या मुक्त हालचाली घेण्यात आल्या . विद्यार्थ्यांनी ताडासन , वृक्षासन , अर्धचक्रासन ,भुजंगासन , पद्मासन इ . आसने करुन दाखविली . मनोरे सादर केले .
यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी रोज सूर्यनमस्कार घालण्याचा व योगासने करण्याचा संकल्प केला .संगीत दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गाण्यांचे सादरीकरण केले .विद्यार्थ्यांना शिक्षकांनी संगीत दिनाचे महत्त्व सांगितले .
माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले . या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .














































