या विद्यार्थिनींना सौ. दिपाली कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले होते. या उल्लेखनीय यशाबद्दल मा. मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विद्यार्थिनी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या .
या स्पर्धेसाठी सर्व विद्यार्थ्यांना गायन शिक्षिका सौ. आदिती आठवले यांनी मार्गदर्शन केले होते. या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. प्रतिभा गायकवाड तसेच उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले .
हुजूरपागा करंडक कला स्पर्धेत यंदा रंगतदार सादरीकरणे झाली. शिक्षक समूहगीत स्पर्धेत म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपल्या सुरेल गायनाने तृतीय क्रमांक पटकावला.
“वेडात मराठे वीर दौडले सात” या गीताच्या समूहगायनाला प्रेक्षकांची दाद मिळाली. शिक्षकांनी एकजुटीने केलेल्या या सादरीकरणातून परिश्रम, निष्ठा आणि कलाप्रेम दिसून आले.या शिक्षकांना गायन शिक्षिका सौ .आदिती आठवले यांनी मार्गदर्शन केले होते .
या यशाबद्दल शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड आणि उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी सहभागी शिक्षकांचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनीही कलेतून सहभाग नोंदवून शाळेचे नाव अभिमानाने उंचावले आहे.”
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांना पालक, शिक्षक ,विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्याकडूनही मनःपूर्वक शुभेच्छा मिळाल्या .

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची भावे प्राथमिक शाळा, पुणे आणि १९८८ सालचे इयत्ता ४ थी (अ) चे माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आशिष चांदोरकर स्मृती करंडक आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेत भावे प्राथमिक शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली.
इयत्ता १ ली ते ४ थी गटामध्ये झालेल्या या स्पर्धेत भावे प्राथमिक शाळेने तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील कु. तन्वी मोटे हिने उत्कृष्ट सादरीकरण करून उत्कृष्ट वाचक पुरस्कार पटकावला . बक्षीस वितरण समारंभ माजी विद्यार्थी सिद्धार्थ महाशब्दे व शाळेच्या महामात्रा डॉ . मानसी भाटे यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी १९८८ सालचे इयत्ता ४ थी (अ) मधील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या यशामागे सहशिक्षिका श्रीमती रेणुका महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मा. मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व मा. उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे तसेच मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती रेणुका महाजन यांचे कौतुक केले.

'गुरुकुल चित्र काढा चित्र रंगवा ' स्पर्धेत म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेला भरघोस यश मिळाले आहे . या स्पर्धेत शाळेला सर्वोत्कृष्ट सहभागासाठी बक्षीस जाहीर झाले आहे.. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे आहेत .
इ . १ ली
शर्विल रणजीत राऊत
कृत्विक प्रविण गाडे
त्रिशा संदेश मोरे
रुशिता आशिष रजपूत
शर्वरी समीर देवधर
प्रणाली सुनील चव्हाण
इ . २ री
स्वयंम प्रमोद आंबेडे
इ . ३ री
कृषीका लखन तिकोणे
अवनी शिवा मोरे
स्वराली सुशांत बाणे
अदिती अनंत देशमुख
ईशा संदीप देशमुख
स्वरा रासकर
इ . ४ थी
सागर उमेश बनसोडे
पौर्णिमा तानाजी लाळे
स्वराज राजेश जाधव
अनुष्का रामदास वाईगडे
काव्या निलेश जाधव
प्रसन्न विजय लडकत
हर्षिता योगेश पालकर
स्वरा विशाल मोरे
वैष्णवी निळकंठ खंदारे
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक चित्रकला शिक्षिका सौ .ऐश्वर्या जोशी यांचे खूप खूप अभिनंदन??
माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या चित्रकला शिक्षिका सौ .ऐश्वर्या जोशी यांचे कौतुक केले .
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजूरपागा लक्ष्मी रोड , पुणे आयोजित हुजूरपागा करंडक कला व क्रीडा आंतरशालेय क्रीडा स्पर्धेमध्ये म . ए . सो . भावे प्राथमिक शाळेच्या मुलींच्या संघाने लंगडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे . बॉल पासिंग स्पर्धेत मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला आहे तसेच अडथळा शर्यतीमध्ये व्दितीय क्रमांक मिळविला आहे .
या सर्वांना श्री .विशाल शितोळे , श्री . विवेक डफळ , श्री . राजेंद्र वेदपाठक यांनी मार्गदर्शन केले होते . मा.मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड , मा.उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी मार्गदर्शक शिक्षकांचे व विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सुभाषित अभियान पुणे जनपद स्तरीय स्पर्धा २०२४.. या सुभाषित पाठांतर स्पर्धेत म .ए .सो . भावे प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरी मधील खालील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे .
प्रथम क्रमांक- समीक्षा कदम
द्वितीय क्रमांक- आरोही कदम
तृतीय क्रमांक- उत्कर्ष बोडस व स्वरा भावे
या सर्व विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षिका मृणालिनीताई खरे यांनी मार्गदर्शन केले होते . माननीय मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा गायकवाड व माननीय उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले .
म.ए .सो . रेणुका स्वरूप गर्ल्स मेमोरियल हायस्कूल आयोजित पुनव करंडक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत म.ए .सो .भावे प्राथमिक शाळेतील जान्हवी बागव हिने एकूणात द्वितीय क्रमांक पटकावला..जान्हवीला श्रीमती रेणुका महाजन यांनी मार्गदर्शन केले होते .
मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी या विद्यार्थिनीचे व तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका श्रीमती रेणुका महाजन यांचे कौतुक केले .
आपल्या म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका रेणुका मधुकर महाजन यांना दि. २२ जून २०२४ रोजी "ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटी" द्वारा उल्लेखनीय शैक्षणिक कार्यासाठी "ज्ञानांजन युवा पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले. ज्ञानांजन शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
शाळेच्या मा. मुख्याध्यापिका प्रतिभा ताई गायकवाड, उपमुख्याध्यापिका वृषाली ठकार यांच्या सोबत सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी त्यांचे या वेळी अभिनंदन केले. रेणुका महाजन यांचे हार्दिक अभिनंदन.








