सन २०२६-२७ प्रवेशा संदर्भात
इ .१ली साठी ( सन २०२६-२७ )म.ए.सो भावे प्राथमिक शाळेत नवीन प्रवेश सुरु आहेत. वयाची ६ वर्षे पूर्ण असणाऱ्या बालकांच्या पालकांनी खालील प्रवेशाची लिंक भरून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा .
सन २०२६-२७ प्रवेशा संदर्भात
प्रवेश प्रक्रिया
- दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन चौकशी फॉर्म सबमिट करा किंवा
- भावे प्राथमिक शाळा,१४५३/१४५४ सदाशिव पेठ, पुणे ३० येथे भेट द्या.
- फोन नं.०२०-२४४७२४८९/ ७०३०२०५३१९
- प्रवेश प्रक्रिया-भावे प्राथमिक शाळा १४५३/१४५४ सदाशिव पेठ, पुणे ३०. येथून इयत्ता १ली ते ४थी साठी मोफत प्रवेश अर्ज प्राप्त करा. त्याचवेळी नवीन प्रवेशा संबंधी ऑफिसमधून माहिती घेऊ शकता.
- प्रवेश अर्ज २८ नोव्हेंबर,२०२५ नंतर खालील वेळात प्राप्त करू शकता.
वेळ
सोम ते शुक्र – १० ते २ - नवीन प्रवेश अर्ज प्राप्त केल्यानंतर प्रवेश अर्ज बिनचूक भरणे.
- भरलेला प्रवेश अर्ज भावे प्राथमिक शाळा सदाशिव पेठ येथे १ डिसेंबर नंतर ११ ते ३ या वेळात ऑफिसमध्ये स्वीकारले जातील .
- प्रवेश अर्ज देतेवेळी विद्यार्थी बरोबर असणे आवश्यक आहे.
- इ.२ री ते ४ थी साठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास पूर्वीच्या शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला, संचयी नोंद पत्रक आवश्यक आहे.तसेच आधीचे प्रगती पुस्तक असावे.आधार कार्ड आणणे आवश्यक आहे.
शनिवार – ११ ते २ (रविवार व सुट्टीचे दिवस वगळता.)
Online प्रवेश प्रक्रिया
online प्रवेशासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म भरून त्याची प्रिंट काढून म.ए.सो.भावे प्राथमिक शाळा सदाशिव पेठ पुणे 30 .येथे जमा करून योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून आपला प्रवेश निश्चित करा.
शाळा प्रवेशासाठी वय निकष
इयत्ता १ ली – ६ वर्षे पूर्ण -( १ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२१)
इयत्ता २ री – ७ वर्षे पूर्ण
इयत्ता ३ री – ८ वर्षे पूर्ण
इयत्ता ४ थी – ९ वर्षे पूर्ण
(प्रवेश मर्यादित आहेत.)
