म. ए. सो. ज्ञानवर्धिनी शिष्यवृत्ती परीक्षेत म .ए .सो भावे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश! 🌟🏆

म. ए. सो. ज्ञानवर्धिनी शिष्यवृत्ती परीक्षेत म .ए .सो भावे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश! 🌟🏆

मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता चौथीच्या म. ए. सो. ज्ञानवर्धिनी शिष्यवृत्ती परीक्षेत सर्व घटक शाळांमधून  प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान म .ए .सो. भावे प्राथमिक शाळेच्या खालील तीन विद्यार्थ्यांनी मिळवला आहे.

🥇 स्वरांजली योगेश जाधव

🥇 यश रघुनाथ कदम

🥇 वेदांत सचिन इंदलकर

या तिन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा  पारितोषिक वितरण समारंभात मान्यवर श्री. इंद्रनील चितळे ।(Managing Partner, चितळे बंधू मिठाईवाले) यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या विद्यार्थ्यांना श्रीमती रेणुका महाजन यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे, उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार, शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ तसेच महामात्रा डॉ. मानसी भाटे यांनी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती रेणुका महाजन मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Scroll to Top