म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेची नाट्यवाचन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची भावे प्राथमिक शाळा, पुणे आणि १९८८ सालचे इयत्ता ४ थी (अ) चे माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आशिष चांदोरकर स्मृती करंडक आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेत भावे प्राथमिक शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली.
इयत्ता १ ली ते ४ थी गटामध्ये झालेल्या या स्पर्धेत भावे प्राथमिक शाळेने तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील कु. आरोही पाठक हिने उत्कृष्ट सादरीकरण करून ‘उत्कृष्ट वाचक’ हा पुरस्कार पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांना श्रीमती रेणुका महाजन यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे, मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व मा. उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती रेणुका महाजन यांचे कौतुक केले.
भावे प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करत असते. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य, आत्मविश्वास व सर्जनशीलता व्यक्त करण्याची संधी मिळत असून, शाळा अशा विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे.

Scroll to Top