शाळेचा इतिहास

पुणे शहर ही महाराष्ट्रातील शिक्षणाची पंढरीच ठरते. या पंढरीतील म. ए. सोसायटीने जानेवारी १८९६ मध्ये एक प्राथमिक शाळा सुरू केली. काही वर्षांपूर्वीच 130 वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा संपन्न झालेली आज अस्तित्वात असलेली हीच ती भावे प्राथमिक शाळा होय. सन १८६० मध्ये क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, वामनराव भावे व लक्ष्मणराव इंदापूरकरांनी &;पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' ही संस्था स्थापन केली. पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची मराठी शाळा निघणार हे कळताच श्री केशव पांडुरंग गोडबोले यांची सिटी स्कूल म्हणून प्रसिद्ध असलेली व श्री धोंडो अनंत क्षीरसागर यांचे ताब्यात असलेली शाळा त्यांनी सर्व मालकी हक्कसह श्री वामनराव भावे यांच्या
स्वाधीन केली आणि पुढे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ब्रांच मराठी शाळा असे नाव देण्यात आले. श्री क्षीरसागर यांना त्या शाळेचे मुख्याध्यापक नेमून आठ शिक्षकांसह शाळेचा शुभारंभ इ.स. १८९६ मध्ये झाला.
शाळेची सुरुवात साठे वाड्यात झाली हळूहळू मराठी शाळेची विद्यार्थी संख्या वाढू लागली सन १९२३
मध्ये शाळा नाना वाड्याजवळ संस्थेच्या मालकीच्या इमारतीत भरू लागले या शाळेला बुधवार पेठ ची
शाळा असे म्हणू लागले कालांतराने इमारत अपुरी पडू लागल्यामुळे ही शाळा सदाशिव पेठ येथे
नेण्यात आली.
या शाळेला सदाशिव पेठ मराठी शाळा असे म्हणत असत. त्यानंतर १९ ऑक्टोबर १९३१ रोजी संस्थेने
मराठी शाळेकर्ता बांधलेल्या नवीन इमारतीत शाळा भरण्यास सुरुवात झाली. संस्थेचे संस्थापक कै.
वामनराव भावे यांचे स्मरणार्थ या सदाशिव पेठ मराठी शाळेत "भावे प्राथमिक शाळा" हे अधिकृतपणे
नाव देण्यात आले. १९३६ च्या सुमारास प्राथमिक शाळेला जागा पुरेनाशी झाली. त्यामुळे डॉक्टर ढमढेरे
यांचे वाड्यात तसेच भरत नाट्य मंदिर चे हल्लीचे जे स्टेज आहे तेथेही काही वर्ग भरत होते. शाळा
सकाळ दुपार अशी भरू लागली त्यानंतर सन १९६२-६३ मध्ये भरत नाट्य मंदिराच्या पिछाडीस
दुमजली इमारत बांधण्यात आली होती. तेथे प्राथमिकचे वर्ग भरू लागले. सध्या तेथे शिशु शाळा भरत
आहे. सन १९८७ मध्ये ही इमारत धोक्याचे झाल्यामुळे ती उतरविण्यात आली. ४ मे १९८३ रोजी
शाळेच्या आवारातील जे मोकळे मैदान होते त्या जागी शाला समितीचे अध्यक्ष श्री द. म .आळतेकर
यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन १ मे १९८५ मध्ये नवीन इमारतीचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर
आ . . जोशी यांच्या हस्ते झाले. प्रशस्त सभागृहासन दोन मजली इमारतीत भावे प्राथमिक शाळेचे
वर्ग भरू लागले. (१९८७ पासून).
अशाप्रकारे कधी अपुरी जागा तर कधी सुविधांच्या अभावामुळे सुरुवातीच्या काळात शाळेची अनेक
जागांमध्ये स्थलांतरे झाले. आता शाळेला स्थैर्य प्राप्त होऊन भावे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी
अध्यायात ग्रंथालय सर्वसाधारण साहित्याने सुसज्ज असे स्वतंत्रपणे प्रयोगशाळा तसेच मूकबधिर
विद्यार्थ्यांसाठी उमेद वर्गाची स्वतंत्ररीत्या सोय उपलब्ध आहे. शाळेमध्ये पहिलीपासून संस्कृत,
कम्प्युटर, इंग्लिश संभाषण असे नाविन्यपूर्ण वर्ग घेतले जातात. आपली संस्कृती जपण्यासाठी शाळा
कायमच अग्रेसर असते.

सदर योजना शाळेत 1976 साली कै. प्र. ल. गावडे यांच्या प्रयत्नाने सुरू झाली. सुरवातीला एकच युनिट होते. सुप्रिया वष्ट व बापट बाईंनी या युनिटचे काम पाहिले. काही वर्षांनी दुसरे युनिट सुरू झाले.

  • आतापर्यंत 100 पेक्षा जास्त विद्यार्थी या योजनेतू शिकून बाहेर पडले आहेत व यशस्वीपणे आपल्या नोकरी व व्यवसायात कार्यरत आहेत.
  • एका विशेष शिक्षिकेला 8 विद्यार्थी असा सरकार मान्य आकडा असतो
  • सन 2025-26 मध्ये पहिली ते चौथीची मिळून 13 विद्यार्थी आहेत.
  • विशेष शिक्षिका म्हणून सौ वृंदा पंडित कार्यरत आहेत.
Scroll to Top